कोरोनानंतर आता दिल्लीकरांना डेंगूचा धोका; आठ वर्षांतील ‘रेकॉर्डब्रेक’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीसह देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानंतर आता दिल्लीकरांना मच्छर, डासांपासून होणाऱ्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. मलेरिया, चिकनगुनिया आणि डेंगूसारख्या आजाराचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात डेंगूच्या प्रकरणाने मागील 8 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

राजधानी दिल्लीत एका आठवड्यात डेंगूचे 4 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गेल्या 5 महिन्यातील डेंगूची एकूण रुग्णसंख्या 25 वर पोहोचली आहे. ही संख्या 2013 नंतरची सर्वाधिक आहे. डेंगूसह चिकनगुनियाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता चिकनगुनियाचे एकूण चार रुग्ण झाले आहेत. पण मलेरियाचा एकही रुग्ण नोंदवला गेला नाही. मात्र, दिल्लीत आत्तापर्यंत मलेरियाचे एकूण 8 रुग्ण आढळले आहेत.

असा पसरतो डेंगू…

डेंगू हा एकप्रकारचा मच्छर असतो. तो पावसाळ्यात सर्वाधिक पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्ये आत्तापर्यंत पाऊस आला नाही तरीही वर्षभर डेंगूचे प्रकरणे समोर येत आहेत. पण पावसाळ्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जर कोणालाही ताप किंवा डेंगूची लक्षणे दिसू लागतील तर रक्ताची टेस्ट करावी.

हे काम करा…

स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. या काळात तुमच्या घरातील परिसरात पाण्याचा साठा दिसत असेल तर ते स्वच्छ करावे. लक्षणे दिसल्यानंतर तातडीने डॉक्टरांकडे जावे. डेंगूपासून वाचण्याचा उपाय म्हणजे त्याचा फैलाव होण्यापासून टाळावे.

डेंगू तापाची लक्षणे काय?

– मांसपेशी, सांधे, डोके आणि पूर्ण अंगदुखी

– शारीरिक कमजोरी, भूक न लागणे

– शरीरावर रॅशेसही येऊ शकतात.

– डेंगू असताना ताप 3-4 दिवसांपर्यंत राहतो. यासह पोटदुखी, उलटीचा त्रासही जाणवतो.

– ताप येणे आणि थंडी वाजणे

– कधीतरी ब्लड प्रेशर सामान्यपासून कमी होणे

लक्षात ठेवा या गोष्टी…

– डेंगूचा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत जात नाही.

– मच्छरच्या माध्यमातून पसरतो. निरोगी व्यक्तीला डेंगू संक्रमित करू शकतो.

– ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना याचा जास्त धोका असतो.

– डेंगूचा मच्छर फक्त दिवसाच चावतो.

– कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होतो.

– डेंगूच्या मच्छर निर्मितीपासून वाचावे.

– घराच्या परिसरात पाणी साठू देऊ नका

– कूलरचे पाणी दर आठवड्याने बदलत राहा

– टेरेसवर डब्बे, टायर आणि जुन्या भांड्यात पाणी जमा होऊ देऊ नका. अशाप्रकारे तुम्ही मच्छरांची उत्पती रोखू शकता.