सरकारवर टीका केल्यास थेट तुरुंगवास

मॉस्को : वृत्तसंस्था – रशिया ही जगातील दुसरी महासत्ता आहे. त्यामुळे तेथील राजकारण नेहमीच चर्चेचा विषय असतो. रशियन सरकारने चर्चा होण्यासारखा वादग्रस्त कायदा केला आहे. हा कायदा म्हणजे देश, सरकार, समाजावर टीका केल्यास जबर दंड किंवा थेट तुरुंगवास घडू शकतो. रशियन सरकारने केलेल्या या नव्या कायद्यानुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार, सरकारी अधिकारी, राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यावर टीका केल्या, ते रशियन नागरिकांना महागात पडू शकते. रशियन सरकारने घेतलेला हा निर्णय हुकूमशाही वृत्ती वाढवणारा आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

जर नागरिकांनी रशियन सरकार, देश, समाज, सरकारी अधिकारी, राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावर टीका केल्यास त्यांना 1,00,000 रुबल्स एवढा दंड भरावा लागेल. भारतीय चलनात 1 लाख 6 हजार 315 रुपये इतकी दंडाची रक्कम आहे. शिवाय टीका तुम्ही सतत करत केली तर दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल.

रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात युनायटेड रशिया पार्टीचं बहुमत आहे. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर त्वरित झाले. सरकारवर ऑनलाइन माध्यमातून केलेली टीका अपमानास्पद समजली जाईल. याशिवाय सरकारला एखादी बातमी खोटी वाटल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. किंवा त्या कंपनीवर थेट बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात येईल. यात नवलं असे की संबंधित बातमी खोटी आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकारही सरकारी पक्षाला असणार आहे. या कायद्याची घोषणा मॉस्कोस्थित सोव्हा सेंटरचे प्रमुख अलेक्झांडर वेर्कोवस्काय यांनी केली.

दरम्यान, हा कायदा देशात हुकूमशाही आणणारा असून, हा लोकांवर अन्याय असेल, त्यांची मुस्कटदाबी असेल अशी भावना अनेक समाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

ह्या हि बातम्या वाचा

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ४५ पाकिस्तानींना भारतीय नागरिकत्व

भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह ‘या’ 14 राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस

२ हजारांची लाच घेताना पाटबंधारे विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मार्चअखेर कर्ज होणार स्वस्त