विधानसभा निवडणुकीपर्यंत नवीन वाहतूक अधिनियम लागू होऊ शकत नाहीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – विधानसभा तोंडावर असताना केंद्राने लागू केलेल्या मोटर वाहन अधिनियमाविरोधात देशात मात्र नाराजीचे वातावरण आहे. परंतू राज्य सरकार पुढील महिन्यात राज्यात हे अधिनियन लागू होऊ शकत नाही. राज्यात हे नियम निवडणूका पार पडल्यावर लागू होऊ शकतात. राज्य सरकारने यासंबंधित कायदा आणि न्यायालयाकडे या संबंधित मत मागवले आहे. मोटर वाहन कायद्याविरोधात सध्या वाहन चालकांमध्ये अत्यंत नाराजी आहे.

राज्यात लवकर विधानसभा निवडणूका पार पडणार आहेच. परंतू राज्यातील सत्ताधारी भाजप सरकार ही जोखीम उचलू इच्छित नाही. नितिन गडकरी यांची हे नियम बनवण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. परंतू असे असताना राज्यात हे नियम लागू करण्याची जोखीम राज्य सरकार उचलू इच्छित नाही.

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, हे वाहतूक नियम लागू करण्याचा मताचे आम्ही नाही, यासंबंधित कायदा आणि न्यायालय विभागाकडून मत मागवण्यात येईल. त्यानंतर वाहतूक नियमांच्या दंडाचे दर ठरवण्यात येतील. राजस्थान, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात हे निर्णय लागू करण्याचा निर्णय अजून झालेला नाही.