New Protine Blood Test | नवीन प्रोटीन टेस्टद्वारे 4 वर्षे अगोदर जाणून घेवू शकता ‘हार्ट अटॅक’ची रिस्क; जाणून घ्या काय सांगते संशोधन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – New Protine Blood Test | मनुष्यात अचानक होणार्‍या आजारांमध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्यूअर (Heart Attack, Stroke And Heart Failure) केव्हा होतो हे कळत नाही. ज्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ हार्ट अटॅक येण्यापूर्वीच ओळखू शकणारी चाचणी (Research) असू शकते का, यावर संशोधन करत आहेत (New Protine Blood Test). शास्त्रज्ञांनी आता असा तांत्रिक शोध लावला आहे, ज्याद्वारे या आजारांचा वेळीच शोध लावला जाऊ शकतो (New Protine Blood Test Can Predict Risk Heart-Failure, Stroke Four Years Before It Happens).

 

’द गार्डियन’च्या वृत्तानुसार, नुकत्याच झालेल्या संशोधनानंतर संशोधकांनी असे उघड केले आहे की, ब्लड टेस्टच्या (Blood Test) माध्यमातून पुढील 4 वर्षांत हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्यूअर किंवा यापैकी कोणत्याही एकाचा अंदाज लावला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू; यासोबतच या गोष्टींपासून व्यक्तीला धोका आहे की नाही हे समजू शकते (New Protine Blood Test).

 

शास्त्रज्ञांच्या मते, ही चाचणी रक्तातील प्रोटीनच्या प्रमाणावर अवलंबून असते, ज्यामुळे रोगांबद्दल अचूक अंदाज लावता येतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, या चाचणीद्वारे रुग्णांची सध्याची औषधे काम करत आहेत की नाही किंवा त्यांना रोगाचा धोका कमी करण्यासाठी अतिरिक्त औषधांची गरज आहे का, हे शोधणे शक्य होणार आहे.

 

बोल्डर, कोलोरॅडो येथील अमेरिकन कंपनी सोमालॉजिकच्या संशोधकांच्या टीमने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाची जवळपास 11,000 सहभागींवर चाचणी घेण्यात आली. डॉ. स्टीफन विल्यम्स (Dr. Stephen Williams) यांनी द गार्डियनला सांगितले की, मला वाटते की, ही चाचणी एखाद्या व्यक्तीला अतिरिक्त उपचारांची आवश्यकता आहे का या प्रश्नाचे उत्तर देण्यास सक्षम आहे.

अशी चाचणी युनायटेड स्टेट्समधील विविध आरोग्य प्रणालींमध्ये आधीपासूनच वापरली जात आहे.
तसेच डॉ. विल्यम्स यांनी सांगितले की, जनुकीय चाचणीद्वारे काही आजारांच्या धोक्याचा अंदाज लावता येतो.
संशोधकांच्या मते, एखाद्या व्यक्तीचे अवयव, ऊती आणि पेशी कोणत्या वेळी काम करत असतील, याचाही अंदाज प्रोटीनच्या चाचणीद्वारे लावता येतो.

 

विल्यम्स आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 22,849 लोकांच्या ब्लड प्लाझ्मा सॅम्पलमधील (Blood Plasma Samples) 5,000 प्रोटीन तपासण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला
आणि 4 वर्षांनंतर हार्ट अटॅक, स्ट्रोक, हार्ट फेल्यूअर किंवा मृत्यूशी संबंधित 27 प्रोटीन ओळखली.
संशोधकांनी नंतर 11,609 लोकांची चाचणी केली ज्यांना पूर्वी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक झाला होता.
त्यानंतर असे आढळून आले की त्यांचे मॉडेल सध्याच्या जोखीम स्कोअरपेक्षा जवळजवळ दुप्पट चांगले आहे.

 

सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.
की, या संशोधन कार्यक्रमाचे उद्दिष्ट एक प्रोटीओमिक प्रोग्नोस्टिक चाचणी साध्य करणे आणि सिद्ध करणे होते
ज्याने चाचण्यांच्या अनुषंगाने कालांतराने हृदयसंबंधीत प्रमुख आजार आणि मृत्यूंबाबत भविष्यवाणी केली होती.

नवीन चाचणी भारतातील हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी गेम-चेंजर देखील ठरू शकते,
जेथे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग जसे की इस्केमिक हृदयरोग आणि सेरेब्रोव्हस्कुलर रोग जसे की स्ट्रोकमुळे 17.7 दशलक्ष मृत्यू होतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, भारत (विशेषत: तरुण लोकसंख्येमध्ये) जगभरातील या मृत्यूंपैकी पाचवा हिस्सा आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- New Protine Blood Test | new protine blood test can predict risk heart failure stroke four years before it happens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra SSC Result 2022 | दहावीचा निकाल जाहीर ! यंदा मुलींची बाजी; राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के

 

Raosaheb Danve | ‘भाजप वेगळा डाव टाकणार, अन्…’ – रावसाहेब दानवे

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर