मोदी २.० सरकार मोठं ‘गिफ्ट’ ? एकाच कार्डव्दारे देशभरात करा ‘मेट्रो’चा प्रवास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकार देशभरातील मेट्रो प्रवाशांसाठी पुढील काही महिन्यात मोठी भेट देऊ शकते. ‘वन नेशन वन कार्ड’ या योजनेवर काम सध्या चालू आहे. ही योजना लागू झाल्यानंतर देशाच्या कोणत्याही शहरात मेट्रोमध्ये एकच कार्ड वापरून प्रवास करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘वन नेशन वन कार्ड योजना’ लागू झाल्यानंतर एका शहरातील मेट्रो कार्ड वापरून कोणतीही व्यक्ती देशातील कोणत्याही मेट्रोमधून कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करू शकणार आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वन नेशन वन कार्ड’ योजनेवर वेगाने काम होत आहे. पुढील ६ महिन्यात ही योजना लाँच केली जाऊ शकते.

या योजनेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘वन नेशन वन कार्ड’ या योजनेअंतर्गत देण्यात येणारे कार्ड हे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सारखे असेल. या कार्डाचा वापर करणे हे खुप सोप्पे आणि सहज असेल. कार्ड चोरीला गेल्यानंतर किंवा हरवल्यानंतर ब्लॉक करता येईल किंवा नवीन कार्ड तयार करता येईल.

कार्डसाठी केवायसी प्रक्रिया गरजेची

कार्डचा वापर दुसऱ्या व्यक्तीकडून केला जाणार नाही, याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वन नेशन वन कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी प्रक्रियेचे ( know your custmor) पालन करावे लागेल. हे कार्ड निवडक बँकेकडून बनवले जातील आणि कार्ड बनविण्यासाठी पासपोर्ट व आधारकार्डची गरज लागेल. हे कार्ड काढण्यासाठी परदेशी नागरिकांना ओळख पत्र म्हणून पासपोर्ट ची झेरॉक्स द्यावी लागेल.

स्मार्ट कार्डची वैशिष्ट्ये

सुरवातीला या स्मार्ट कार्डचा वापर फक्त मेट्रोमध्ये होईल. दोन महिन्यानंतर या कार्डमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश केला जाईल. एनएमआरसीच्या बसमध्ये या कार्डचा वापर डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या जागी देखील करण्यात येईल.

सिने जगत –

‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स म्हणाले…

‘शिळ्या कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो

आजही ‘या’ अभिनेत्याला मुलं घालतात लग्‍नाची मागणी, येतात अश्‍लील मेसेज्स