ड्रीम गर्लचा नवा व्हिडीओ ‘रिलीज’, दाखविली पुजाच्या तिसर्‍या पुजारनची ‘झलक’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दिग्दर्शक राज शांडिल्य यांचा ‘ड्रीम गर्ल’ या फॅमिली एंटरटेनमेंट वर आधारित असलेल्या चित्रपटाचा एक व्हिडीओ रिलीज झाला आहे.या चित्रपटात बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराणा हा एका वेगळ्याच भूमिकेत चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार येत आहे. हा व्हिडीओ आयुष्मान खुराणा आणि दग्दर्शक राज शांडिल्य यांनी शेअर केला आहे.

शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे कि, ‘ मिलिए पूजा के आशिक नंबर 3 से..! लड़के लगते है उन्हें फेक, लेकिन वह अपने ड्रीम गर्ल के लिए कुछ भी कर सकती है.’ तसेच या व्हिडीओच्या थंबनेल मध्ये लिहिले गेले आहे कि, पूजारन नंबर 3, मॅन हेटर. याचाच अर्थ चित्रपटात पूजाला पसंद करणारी निधी विष्ठ चित्रपटात पुरुषांचा तिरस्कार करत असते.

https://www.instagram.com/p/B1yQGdFgEcA/?utm_source=ig_web_copy_link

आत्तापर्यंत शेअर केला गेलेला हा या चित्रपटाचा तिसरा व्हिडीओ आहे. यामध्ये दाखवले गेले आहे की, आयुष्मान एक गाडी चालवत असताना पूजा बनी त्याला बोलत असते कि, सर्व पुरुष नालायक असतात. यावर पूजा म्हणते कि, सर्व पुरुष असे नसतात. यानंतर ती एका कॉल सेंटर मध्ये जाते आणि पूजाला विचारते. परंतु तिथे तिची एका व्यक्तीशी ओळख होते जो तिचा प्रियकर असतो. फॅमिली एंटरटेनमेंट ची धम्माल असेलला ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट येत्या १५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचे व्हडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत. मागच्या काही दिवसांपासून आयुष्मान खुराणा आपल्या पत्नी सोबत विदेशात सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –