Kolhapur News : नव्या मतदारांना मिळणार PVC कार्ड; जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांची माहिती

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून (दि.25) नोंदणीचे काम सुरु करण्यात येणार आहे. नव मतदारांना केंद्रस्तरीय अधिकार्‍यांच्या (बीएलओ) माध्यमातून पीव्हीसी मतदार ओळखपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी सांगितले.

भगवान कांबळे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांना ई-पिक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम 3 विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रियेत भाग घेतलेल्या दिव्यांग मतदारांना गौरविणार आहे. तसेच, ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत आजअखेर एकूण 910 मतदारांनी सहभाग घेतलाय. त्यांना ऑनलाईन प्रशस्तीपत्र दिले असून या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनासाठी आम्ही आहोत. सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक मतदार’ हा विषय घेण्यात आला आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी सांगितले आहे.