7 वा वेतन आयोग : 1.1 कोटी केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! 2020 च्या ‘बजेट’नंतर पगारात 21000 रूपयांपर्यंत वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थसंकल्प 2020 नंतर केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल अशी अपेक्षा आहे. प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचा आणि पेन्शनरांच्या महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवणार आहे.

महागाई भत्ता वाढवल्यानंतर केंद्र सरकारकडून सुमारे 1.1 कोटी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना तसेच पेन्शनरांना मोठा दिलासा मिळणार आहे. जाणकारांच्या हिशोबानुसार, केंद्र सरकार महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करून ती वाढ 17 हून 21 टक्क्यांवर घेऊन जाणार आहे. मार्च 2020 पुर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करेल. सध्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्यास तो 21 टक्क्यांवर जाईल. महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर प्रवास भत्त्यात देखील तेवढ्याच टक्कयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रथमश्रेणीच्या केंद्रीय कर्मचार्‍याचे बेसिक हे 18 हजार आहे तर कॅबिनेट सेक्रेटरी दर्जाच्या अधिकार्‍याचं बेसिक हे 2.5 लाख आहे. प्रथमश्रेणीच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर त्यांच्या पगारात किमान 720 ते 10000 रूपयांची वाढ होणार आहे. मिडीयाच्या रिपोर्टनुसार, रेल्वेच्या कर्मचार्‍यांच्या पगारात 5000 ते 21000 रूपयांची वाढ होण्याची आहे. जानेवारी 2019 मध्ये सरकारनं महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला आहे. दरम्यान, गुजरात सरकारनं त्यांच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढवला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या दि. 1 फेब्रुवारी 2020 ला वार्षिक अर्थसंकल्प 2020-21 सादर करणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/