रात्री पत्नीच्या पाया पडून झोपतात खा. रवी किशन, मुलींना देखील देवीसारखं पुजतात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता रवी किशन भोजपुरी, साऊथ आणि बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. रवी किशन अ‍ॅक्टर तर आहेच सोबतच ते गोरखपूरमधून भाजपचे खासदार आहेत. त्यांच्या यशाचं कारण म्हणजे त्यांची मेहनत आणि त्यांच्या कुटुंबाचा त्यांना असलेला सपोर्ट आहे. ते आपल्या पत्नी आणि मुलींना देवीप्रमाणेच पुजतात.

रवी किशन यांनी एका मुलाखतीत पत्नीबद्दल बोलताना सांगितलं होतं की, ते नेहमीच महिलांच्या जवळ राहिले आहेत. त्यांची आई असो, पत्नी असो, मुली असो किंवा मग कोणी अ‍ॅक्ट्रेस असो सर्वांच्याच ते जवळ आहेत.

View this post on Instagram

#iffi #goa

A post shared by Ravi Kishan (@ravikishann) on

रवी यांनी सांगितलं होतं की, ते त्यांच्या मुली आणि पत्नीच्या पाया पडतात. रवी त्यांची पत्नी प्रीती झोपल्यानंतर असं करतात. कारण प्रीती जागी असेल तर त्यांना पाया पडू देत नाही. रवी किशन अशी अनेक कामे करतात जी लोकांना विचित्र वाटतात. 2013 च्या करवाचौथला त्यांनी प्रीतीच्या पायाला वाकून नमस्कार केला होता. बहुतेक पुढील जन्मात आपण महिलेच्या जन्माला जाऊ असा विचार करून त्यांनी असं केलं.

रवी आणि प्रीती 11 वी च्या क्लासमध्ये पहिल्यांदा भेटले होते. प्रीती त्यांच्या स्ट्रगलच्या काळापासून त्यांच्यासोबत आहे. रवी किशनला चार मुलं आहेत. तीन मुली आणि एक मुलगा आहे. रवी आपल्या मुलींना देवी मानतात.

रवी किशनच्या मोठ्या मुलीनं रेवा किशननं अलीकडेच बॉलिवूड डेब्यू केला आहे. सब कुशल मंगल असं डेब्यू सिनेमाचं नाव आहे. या सिनेमात अक्षय खन्ना आणि रेवा लिड रोलमध्ये होते. सिनेमा खास काही चालला नाही. परंतु लोकांनी तिच्या अ‍ॅक्टींगचं कौतुक केलं.

रवी किशन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोालयचं झालं तर काही दिवसांपूर्वीच आलेल्या मरजावां सिनेमात ते दिसले होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. दीर्घकाळापासून ते भोजपुरी पासून दूर आहेत. सध्या ते राजकारणात जास्त सक्रिय आहेत.

You might also like