अभिनेत्री श्रुती मराठेला देवानं दिलंय ‘अफलातून’ सौंदर्य, दिसते एकदम ‘अप्सरा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री श्रुती मराठे ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रीपैंकी एक आहे. श्रुती अ‍ॅक्ट्रेस आहे आणि मॉडेलही आहे. आपल्या सौंदर्यामुळे ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

श्रुती मराठेचा जन्म 9 ऑक्टोबर 1986 रोजी गुजरातच्या वडोदरामध्ये झाला. तिने मुंबईमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. लहानपणापासूनचा तिला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे तिने आपलं करिअर अभिनयातच केलं.

सनई चौघडे या सिनेमातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली होती. हा मराठी सिनेमा यशस्वीही ठरला. त्यामुळेच श्रुती मराठी लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.

सिनेमांव्यतिरीक्त श्रुतीने अनेक मराठी टीव्ही मालिकेतही काम केलं आहे. तिने आजपर्यंत 20 हून अधिक सिनेमे केले आहेत. श्रुतीने हिंदी सोबतच तमिळ, कन्नड सिनेमातही काम केलं आहे. टीव्ही मालिकेत श्रुती खूपच यशस्वी ठरली.

visit : policenama.com