सर्वसाधारण सभेने अविश्वास आणलेले ‘सीईओ’ माने हजर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वसाधारण सभेने अविश्वास ठराव आणलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने हे आज कर्तव्यावर रुजू झाले आहेत. राज्य शासनाने त्यांना काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठविले होते.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे व गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील अंतर्गत संघर्षातून माने यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता. पदाधिकाऱ्यांचं ऐकत नसल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध सर्वसाधारण सभेत अविश्वास ठराव मंजूर करून तो शासनाला पाठविला आहे. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. आज सकाळी 11 वाजता माने हे कार्यालयात हजर झाले आहेत.

विश्वजीत माने यांच्यावर दाखल असलेल्या अविश्वास ठरावाची विभागीय आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे. त्रिसदस्यीय समितीमार्फत माने यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्‍वास ठरावाची चौकशी सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like