अहमदनगर : ‘विधानसभा’ उपाध्यक्षाला ‘टक्कर’ देण्यासाठी शिवसैनिकांकडून ‘यांच्या’ उमेदवारीची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पारनेर विधानसभा मतदार संघातून विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले हे नागनाथ उतरण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त त्यांच्या उमेदवारीची मागणी करण्यासाठी शिवसैनिकांचे शिष्टमंडळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विधानसभा निवडणूक जवळ येत असून सर्वच, पक्षात अनेक उमेदवार सध्या इच्छुक आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी हे शिवसेनेकडून सलग तीन वेळेस निवडून आले आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघ हा नगर तालुक्यातील काही गावांशी जोडला गेला आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील मते निर्णायक ठरू शकतात. नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना उमेदवारी मिळावी, म्हणून तयारी करीत आहेत. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांसह पारनेर मतदारसंघातील कार्यकर्ते संदेश कार्ले यांना उमेदवारी द्यावी, म्हणून मागणी करणार आहेत.

संदेश कार्ले हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. नगर तालुका पंचायत समिती सभापती म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. त्यांनी नगर तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबत वेळोवेळी मोठी आंदोलने करून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमधून संदेश कार्ले यांना उमेदवारी मिळावी, म्हणून मागणी होत आहे. याला पारनेरमधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांचेही पाठबळ मिळू लागले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पारनेर विधानसभा मतदारसंघात नेमके काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोग्यविषयक वृत्त