कला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त : राहूल देशपांडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मनापासून कला सादर करताना आपल्याला उर्जा प्राप्तीची अनुभूती येते, त्याचबरोबर त्याचा आस्वाद घेणार्‍यांना मनाची शांतता प्राप्त होते असे मत सुप्रसिद्ध गायक राहूल देशपांडे यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ‘अस्तित्व’ कार्यक‘माचे उद्घाटन करताना श्री. देशपांडे बोलत होते. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. राजश्री गोखले, प्रा. वृषाली महाजन, प्रा. तनुजा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय संस्कृतीचे अस्तित्व हे पुरातन काळापासून आहे. समृद्धसंपन्न असणार्‍या भारतीय संस्कृतीच्या वारशाचे जतन करणार्‍या ‘अस्तित्व’ या आंतरमहाविद्यालयीन र्सपर्धेचे हे दहावे वर्ष असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रावळ यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.

या वर्षी संगीत, नृत्य, चित्रकला, स्केचिंग, ङ्गॅशन शो, चित्रङ्गित निर्मिती, कोडी, निबंध, मेहंदी, शृंगार, वादन अशा विविध स्पर्धांमध्ये ४७ महाविद्यालयांतील सतराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अनुषा कंचोलेे, सृजा बसू यांनी सूत्रसंचालन आणि सायली तळेकर, अनुष्का कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले.

आरोग्यविषयक वृत्त