काॅंग्रेस आ. अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघात ‘या’ मागण्यांसाठी अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – मतदारसंघात प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जनता मोठया विश्वासाने आमदार निवडून देऊन त्यांच्या विश्वासार्ह विकासात्मक गोष्टीची वाट पाहते. पण भोकर मतदारसंघात प्रलंबित असलेले कुठलेच प्रश्न सुटले नसल्याने आमदार अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघात काँग्रेस पक्ष विविध मागण्या घेऊन रस्त्यावर उतरले आहे. मात्र, भोकर मधील सर्व विकास थांबवण्याचं काम भाजप सरकार मुद्दामहून करत आहे, असा आरोप काँग्रेस पार्टी करत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.

अशोक चव्हाण यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या आमदार अमिता चव्हाण यांच्याच मतदार संघात भोकर येथिल उपविभागीय कार्यालसमोर काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. शेतकरी व भोकर शहर विकासाच्या, बँकेच्या प्रमुख अनेक मागण्या घेऊन धरणे आंदोलन होत असल्याने या आंदोलनास शेतकरी वर्गाकडून व भोकर वासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

या मध्ये अनेकजण आपलं म्हणणं मांडताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांचा जुना मतदारसंघ व आमदार अमिता चव्हाण यांचा चालू मतदार संघ असल्याने भोकरकडे मुदामहून पाठ फिरवली आहे, असं म्हणत होते. या वेळी भोकर काँग्रेस चे माजी तालुका अध्यक्ष तथा मार्केट कमिटी सभापती जगदीश पा भोसीकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पा भोसीकर, मंगराणी अंबुलगेकर, बाळासाहेब रावण गावकर, विनोद चिंचाळकर (माजी नगराध्यक्ष), रामचंद्र मुसळे (संचालक) तसेच इतर अनेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

भाजप सरकारवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी मात्र त्यांना पीक विमा, पीक कर्ज मिळावे म्हणून एक आशा सरकार वर ठेवली आहे. पण सरकार हे काम करत नसल्याने शेतकरी चक्क अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अमिता चव्हाण यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. चक्क विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील धरणे आंदोलन संपूर्ण राज्यभर गाजनार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत त्या भाजप सरकारने पूर्ण कराव्या  यासाठी सर्वजन एकवटले आहेत. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर संपूर्ण शेतकरी वर्ग आगळं वेगळं आंदोलन करणार अशी चर्चा या ठिकाणी होत होती.

आंदोलन कर्त्यांच्या मागण्या –

शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्ज उपलब्ध करून देणे, भोकर ची SBI बँक विस्तारित करून त्या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी वाढवणे, श्रावणबाळ व निराधार लोकांच्या जाचक अटी कमी करणे, शेतकऱ्यांचे वीज बिल कमी करणे व त्यांना 24 तास वीजपुरवठा करणे, महावितरण आपल्या दारी या योजनेत 2011-2014 मधील कोटेशन भरलेल्याना वीज जोडणी देणे, वनविभागाच्या जमिनी शेतकऱ्याच्या ताब्यात अनेक वर्षांपासून आहेत ते कायदेशीर करून देणे, भोकर फाटा ते राहाटी रोड तात्काळ काम चालु करणे, महामंडळ बी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, भोकर शहरात रेल्वे उड्डान पुलाचे काम तात्काळ सुरु करणे. अशा अनेक मागण्या घेऊन भोकर तालुक्याचे प्रलंबित प्रश्न घेऊन धरणे आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सुरू आहे.

काँग्रेसचे आमदार अमिता चव्हाणांच्या मतदार संघातच काँग्रेस पक्षाचे धरणे आंदोलन

दररोज ‘हळदीचे पाणी’ घ्या आणि आश्चर्यकारक फायदे मिळवा

लुक बदलायचायं ? मग ‘या’ मेकअप टीप्स फॉलो करा

भटक्या विमुक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा !

धक्कदायक : बौद्धांना मदत केल्यास १०हजार रु. दंड ठोठवणार, गावात दवंडी देत जातीयवाद्यांनी टाकला बहिष्कार

ग्रामीण भागातील शेतकरी, दलित, अदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड ऊर्जा- दिनकर पावरा