१६ वर्षानंतरचे ‘तेरे नाम’ चित्रपटामधील अभिनेत्रीचे ‘हाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा सुप्रसिद्ध चित्रपट ‘तेरे नाम’ मधून इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री भूमिका चावला सध्या साउथ चित्रपटांमध्ये जोरदार काम करत आहे. नुकतेच या अभिनेत्रीला तिच्या मुलासोबत मुंबईमध्ये स्पॉट केले गेले. त्यावेळी भूमिका कॅज्युअल लुकमध्ये पहायला मिळाली. तिने ब्लॅक कलरचा टॉप घातला होता. भूमिका विना मेकअप खूपच क्यूट दिसत होती.

View this post on Instagram

shot for something for a friend … Revealing it shortly

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t) on

या अभिनेत्रीने २००७ मध्ये योग गुरु हिंदूस्तान ठाकूरसोबत लग्न केले होते. तिने २०१४ मध्ये मुलाला जन्म दिला. सध्या अभिनेत्री भूमिका चावला साउथ चित्रपटांमध्ये खूप व्यस्त आहे. तिचा ‘तेरे नाम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले होते.

अभिनेत्री भूमिका चावलाने २००० मध्ये तमिळ चित्रपटसृष्टीमधून आपल्या करिअरला सुरुवात केली. हिंदी आणि साउथ चित्रपटांव्यतिरिक्त भूमिकाने मल्याळम, पंजाबी, भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये देखील काम केले आहे. ती तेलगू चित्रपट ‘चुप्पी’ मध्ये दिसून आली होती. आता ती बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधून गायब आहे.

View this post on Instagram

A long time ago …

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t) on

भूमिका भलेही बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून गायब असली तरी ती सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती तिचे क्यूट फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे फोटो खूप पसंतीस पडतात. चाहते तिच्या फोटोला लाइक आणि कमेंट देखील करत असतात.

View this post on Instagram

16 sept …2018 ….

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t) on

View this post on Instagram

Have a blessed day 🌻🙏

A post shared by Bhumika Chawla (@bhumika_chawla_t) on

 

आरोग्यविषय वृत्त –

 

You might also like