पाथरी येथे कूल जमाते तंजीमकडून दंगा पीडितांना आर्थिक मदत

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी शहरातील मशिदी मध्ये मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवारी जुम्मा नमाज अदा केल्यानंतर दिल्ली येथील दंगा पीडितांना आर्थिक मदतीसाठी कूल जमाते तंजीम कडून आवाहन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध भागातील मशिदीत 86505 रुपयांची रक्कम जमा झाली
pathri
पाथरी येथील कूल जमाते तंजीमच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जमा झालेली आर्थिक मदत ही दिल्ली येथील दंगा पीडितांना देण्यात येणार आहे. तसेच देशभरात शांतता व बंधुभाव टिकून रहावा म्हणून वेळोवेळी दुआ करण्यात येत आहे.

पंचायत समिती संकुल आवारात पाठीमागील अनेक दिवसांपासुन दिल्ली येथील धर्तीवर शाहीन बाग फुलला आहे. आज 06 मार्च रोजी 52 दिवस पुर्ण होत असून पाथरी येथील शाहीन बागेला नांदेड, परभणी, अंबाजोगाई इतर ठिकाणांहून अनेक वक्ते सहभागी झाले. येथे एनआरसी, सीएए, एनपीआर बद्दल विस्तृत माहिती दिली जाते. दर दिवशी पाथरी येथे शाहीन बाग फुलू लागला आहे. महिलांची ही उपस्थिती लक्षणीय ठरत आहे