मंत्रिमंडळ विस्तार : या ४ दिग्गजांचे मंत्रिपद ‘फिक्स’!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास राजभवनाच्या गार्डनवर पार पडणार आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात ४ दिग्गज आमदारांचे मंत्रिपद फिक्स झाले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर पुण्याला देखील यावेळी संधी देण्यात आली असून भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाळा भेगडे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असल्याचे समोर आले आहे.

या चार दिग्गजांचे मंत्रीपद ‘फिक्स’

राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, अविनाश महातेकर, बाळा भेगडे

राधाकृष्ण विखे पाटील

radhakrishna-vikhe-patil

जयदत्त क्षीरसागर

Jaydutta Khsirsagar

अविनाश महातेकर

Avinash-Mahatekar

बाळा भेगडे

Bala-Bhegde

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून अनेक फेरबदल केले जाणार आहेत. यात काही दिग्गजांना संधी दिली जाणार आहे. तर काही दिग्गज मंत्र्यांना डच्चूही देण्यात येणार आहे. त्यात नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाही मंत्रिपद दिले जाणार आहे. तर त्यांच्यासोबत जयदत्त क्षीरसागर आणि पुणे जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांची मंत्रीपदं फिक्स झाली आहेत. यासोबतच युतीतील मित्रपक्ष रिपाईंला देखील मंत्रिपद देण्यात आले असून अविनाश महातेकर यांचेही मंत्रिपद फिक्स झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुण्यातील भाजपच्या चांगल्या कामगिरीचे बक्षिस

भाजपने लोकसभा, नगरपरिषदा आणि इतर स्थानिक निवडणूकांमध्ये एकूणच चांगली कामगिरी केली आहे. तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळातील आमदार आणि पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेल्या बाळा भेगडे यांच्या कारकि‍र्दीत भाजपला जिल्ह्यात अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे बाळा भेगडे यांची मंत्रि‍पदी वर्णी लागल्याचे बोलले जात आहे.

 

सिनेजगत

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेते ऋषी कपूर यांच्या फॅन क्लबकडून झालेल्या ‘त्या’ चुकीनंतर त्यांनी केले ‘असे’ काही

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप