‘नोडल’ अधिकाऱ्यांनी निवडणूक कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा 2019 निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या काही दिवसात आचारसंहिता घोषित होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीच्या कामकाजाच्या दृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ मुंडे यांनी काल(दि.11 सप्टेंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सर्व यंत्रणांनी टीमवर्क म्हणून अतिशय उल्लेखनीय काम केले. त्यामुळे उस्मानाबाद मधील निवडणुका अत्यंत सुदृढ वातावरणात, व्यवस्थितपणे पार पडल्या. याशिवाय सर्वांनी जबाबदारीने उत्तम काम केल्याने कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. अशीच भूमिका, उत्साह व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून येणाऱ्या विधानसभा निवडणूक 2019 मध्येही सर्वांनी मिळून जबाबदारीने उत्तम काम करावे, असे श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या.

या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शिरीष यादव, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ.प्रताप काळे, संतोष राऊत, शितल आंधळे, महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गजानन नेरपगार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. कोंडेकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्री. गणेश बारगजे, तहसिलदार राजकुमार माने,नायब तहसिलदार चेतन पाटील, राजीव वाबळे, पोलीस निरीक्षक श्री.बाबर, विजय पाटील आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय विविध कक्ष सुरू होणार आहेत. आचारसंहिता कक्ष (कक्ष प्रमुख- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते), कायदा व सुव्यवस्था (कक्ष प्रमुख- निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजेंद्र खंदारे), मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष (कक्ष प्रमुख- निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे), वाहन व्यवस्था व वाहन परवाना देणे (कक्ष प्रमुख- अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र खंदारे), ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापन कक्ष (कक्ष प्रमुख-उपजिल्हाधिकारी श्री. शिरीष यादव), नमुना मतपत्रिका, टपाली मतपत्रिका छपाई करणे, वितरण करणे व प्रदत्त मतपत्रिका,या सर्व कामांवर संनियंत्रण व समन्वय ठेवणे (कक्ष प्रमुख- उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे), तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष (कक्ष प्रमुख- जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे), जिल्हा माध्यम नियंत्रण कक्ष (कक्ष प्रमुख-जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप), वैद्यकीय पथक (कक्ष प्रमुख- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे), अवैध दारू वाटपास प्रतिबंधक कक्ष (कक्ष प्रमुख- राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश बारगजे), प्रशिक्षण कक्ष (कक्ष प्रमुख- उपजिल्हाधिकारी शितल आंधळे व तहसिलदार रूपा चित्रक), C-VIGIL कक्ष (कक्ष प्रमुख- तहसिलदार राजकुमार माने), PWD मदत व संनियंत्रण कक्ष (कक्ष प्रमुख- जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.नागनाथ चौगुले), संगणक कक्ष (कक्ष प्रमुख- जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री.कोंडेकर), एसएमएस मॉनिटरिंग तसेच संदेश व संपर्क कक्ष (कक्ष प्रमुख- जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री. कोंडेकर), बँक खाते तपासणी पथक (कक्ष प्रमुख- लिड बँक मॅनेजर निलेश विजयकर), उमेदवार, राजकीय पक्ष यांचे निवडणूक संबंधीचे खर्च व त्यावरील नियंत्रण (कक्ष प्रमुख- मुख्य लेखा व वित्त अधिकारी शेखर शेटे), स्वीप कक्ष (कक्ष प्रमुख- तहसिलदार अभय म्हस्के) अशा प्रकारे विविध अधिकाऱ्यांना नोडल अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –