धुळे : लोक अदालतीत 1485 प्रकरणे समोपचाराने निकाली

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या आदेशान्वये धुळे जिल्ह्यात दि.१४ सप्टेंबर २०१९ रोजी धुळे जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. आज लोकअदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. न्यायालयातील प्रलंबित १५८६ प्रकरणे ज्यामध्ये धनादेश न वटल्याबाबतच्या केसेस, मोटार अपघात भरपाई प्रकरणे,कौटुंबिक वाद प्रकरणे, आणि भुसंपादन भरपाई प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे वादपुर्व ७७६६ प्रकरणे ज्यामध्ये महानगरपालिका कर वसुलीचे प्रकरणे, फायन्सास कंपनीची थकबाकी प्रकरणे, बँकेची थकबाकी प्रकरणे,कौटुंबिक वाद प्रकरणे तसेच बी.एस.एन.एल कंपनी इत्यादी प्रकरणे ठेवण्यात आली होती.

सदर प्रकरणांमध्ये प्रलंबित प्रकरणे १९१ व दाखलपुर्व १२१५ प्रकरणे समोपचाराने निकाली निघाली. सदर लोकअदालतमध्ये७.१४,०७,४४६/- रूपयांची नुकसान भरपाई व वसुली झाली. लोकअदालत जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती मंगला ज.धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलीे. सदर लोकअदालतसाठी धुळे जिल्हा वकील संघ तसेच तालुका वकील संघ, धुळे महानगरपालिका, सर्व बँका, सर्व इंन्शुरन्स कंपनी, आदी अमुल्य सहकार्य केले त्यामुळे त्यांचे धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like