..म्हणून अभिनेत्री दीपाली सय्यद ‘या’ मंत्र्यावर झाल्या ‘नाराज’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शाळेच्या इमारतीसाठी निधी मागण्यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या भेटीला गेले होते. परंतु शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यास तांत्रिक अडचणीचे कारण सांगून नकार दिला. त्यावर अभिनेत्री सय्यद यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा नियोजन समिती किंवा इतर योजनेच्या माध्यमातून शाळा इमारतीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. ना. शिंदे यांनी आम्हाला शाळाच्या बाबतीत निधी उपलब्ध करून देताना मर्यादा येतात. तुम्हाला निधी उपलब्ध करायचाच असेल तर राज्यसभा किंवा विधान परिषद सदस्याकडे मागणी करा, असे सांगत स्वतः जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाल्या की, आज आम्ही फार मोठ्या अपेक्षेने पालकमंत्री शिंदे यांना भेटलो. त्यांना शेडगावच्या शाळेसोबतच संपूर्ण जिल्ह्यातील शाळांची काय अवस्था आहे, हे निदर्शनास आणून दिले. मात्र, त्यांनी नकारात्मक भूमिका दाखवत शाळेच्या निधी उपलब्ध होण्याबाबत नकारघंटा वाजवली. या भेटीत आमची निराशा झाली असली तरी आम्ही अन्य पर्यायसमोर ठेवून निधी उपलब्ध करून शाळा कशी उभी करायची यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

आरोग्यविषयक वृत्त –