#Video : ..म्हणून दिशा पटानीनं काढला तिचा ‘TOP’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या बोल्डनेसमुळे आणि फिगरमुळे नेहमीच चर्चेत असते. दिशा काही दिवसांपासून तिचे हॉट फोटोज सोशलवर शेअर करत असते. तुम्हाला सांगू इच्छितो की, सन 2016 मध्ये एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमातून दिशाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती लाईमलाईट मध्ये आल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दिशाने फोटोग्राफर डब्बू रतनानीच्या वार्षिक कॅलेंडरसाठी टॉपलेस होत पोज दिली होती. दिशाने या फोटोंपैकी एक फोटो काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

या फोटोमध्ये दिशा बसलेल्या पोजमध्ये दिसत आहे. यात टॉपलेस असून तिने आपल्या हातांनी आपली छाती झाकल्याचे दिसत आहे. यात फक्त काळ्या रंगाची अंडरवेयर आणि बूट घातल्याचे दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये दिशा म्हणते की, “डब्बू रतनानी कॅलेंडर 2017, मेकअप- जोश, हेअर- शेंकी, फोटोग्राफर- डब्बू रतनानी |”

रिपोर्ट्सनुसार, या कॅलेंडर मध्ये एकूण 24 ख्यातनाम लोक दिसणार आहेत. यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय बच्चन, रणवीर सिंग, अक्षय कुमार, प्रियंक चोप्रा, विद्या बालन, आलिया भट्ट, फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ, परिणिती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, सनी लिओनी, संजय दत्त, अनुष्का शर्मा, जॅकलीन फर्नांडिस, श्रद्धा कपूर आणि कृति सेनन यांचा समावेश आहे.

फीचर नावाचा फोटो फीचरला घेणे दुसरा फोटो बातमीच्या आत पहिल्या पॅरेग्राफ नंतर घेणे