‘या’ कारणामुळं राज्याच्या ‘गृह’सचिवांना खंडपीठाचा ‘दणका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जळगावातील अमळनेर येथे गांधलीपुरामधील वेश्या वस्ती संदर्भात दाखल याचिकेत खंडपीठासमोर आलेल्या गंभीर बाबींवरुन थेट राज्याच्या संबंधित सचिवांनाच नोटीस पाठवण्यात आली आहे. 9 सप्टेंबरपर्यंत उपाययोजनेसंबंधित पावले न उचलल्यास कारवाईचे आदेश देण्यात आलेत.

गांधलीपुरा भागातील वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी कुदरतअली मोहम्मदअली आणि रफियोद्दीन शेख हे अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे. औरंगाबाद खंडपीठात यूथ फाऊंडेशनच्या माध्यमातून यासंबंधित याचिका दाखल करण्यात आली असून यावर न्यायाधीश तानाजी नलावडे आणि न्यायाधीश. के के सोनावणे यांच्या खंडपीठात कामकाज सुरु आहे.

याशिवाय स्थानिकांना येथील गैरकृत्याचा त्रास होऊ नये. त्याची तपासणी करण्यासाठी या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, शिवाय हा गैरप्रकार घडत असलेली घरे, मालमत्ता सील करण्यात येण्याचे आदेश देऊन अहवाल खंडपीठात सादर करण्यात यावा. जर खंडपीठाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर यासाठी संबंधित विभागाच्या सचिवांना जबाबदार धरण्यात येईल असे बजावण्यात आले आहे.

खंडपीठाच्या निर्देशानुसार गांधलीपूरा भागात लावण्यात आलेले कॅमेरे झाकण्यात आले आहेत. हे कॅमेरे विविध 16 ठिकाणी लावण्यात आले आहेत. परंतू हे कॅमेरे झाकण्यात आल्याने यात काहीही रेकॉर्ड होत नाही.

You might also like