कश्मीरी मुलींशी लग्न आणि जमीन खरेदीमध्ये ‘ही’ टॉपची 5 राज्य ‘इंटरेस्टेड’, जाणून घ्या महाराष्ट्राचा क्रमांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर देश भरातील पुरुष काश्मीरचा इतिहास जाणून घेत आहेत. तर गुगल सर्चवर ‘Marry Kashmiri Girl’ आणि how can i marry a kashmiri girl या दोन गोष्टी सर्वाधीक सर्च करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर काश्मीरी मुलींशी लग्न करण्यासंदर्भात फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्या सोबतच काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी देखील लोक उत्सुक आहेत.
तसेच वेगवेगळ्या राज्यांमधून काश्मीरी मुलींशी लग्न करण्यासंदर्भात पोस्ट करण्यात येत आहेत. यामध्ये काही राज्ये आघाडीवर आहेत.

Image result for kashmiri beautiful girls hd

ही राज्य या गोष्टीत आघाडीवर

1. पश्चिम बंगालमधील नागरिकांकडून काश्मीरी गर्ल जास्त करून सर्च करण्यात येत आहे.
2. दुसऱ्या स्थानावर झारखंड राज्याचा नंबर लागतो. झारखंड मधील लोकांनी गुगलवर काश्मीरी गर्ल सर्च केले आहे.
3. काश्मीरी गर्ल सर्च करण्यामध्ये तेलंगणाचा तिसरा क्रमांक लागतो.
4. या यादिमध्ये कर्नाटकचा चौथा क्रमांक लागतो
5. काश्मीरी गर्ल सर्च करण्यामध्ये महाराष्ट्रान पाचवा क्रमांक पटकावला आहे.
तसेच काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी गुगलवर हरियाणाने पहिला क्रमांक पटकावला आहे. हरियाणा येथील नागरिकांनी जमीन खरेदी करण्यासाठी सर्वाधीक सर्च केले आहे. हरियाणानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे तर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.

आरोग्यविषयक वृत्त –