‘त्या’ लेडी ‘दबंग’ अधिकाऱ्याच्या प्रकरणात सामाजिक संघटनांनी पालकमंत्र्यांना धारेवर धरलं !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर राज्य शासनाने पूर्वग्रहदूषित व एकतर्फी केलेली कारवाई परत मागे घ्यावी. पुन्हा त्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी खुर्चीवर बसवावे, या मागणीसाठी नगरमधील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. तसेच या संदर्भात आज प्रथमच नगर शहर व जिल्ह्यातील ६ सामाजिक संघटनांची मोट बांधली गेली. निव्वळ मंत्र्याच्या मनमानी फोनवर कुठलीही शहानिशा न करता शिस्तप्रिय सरकारी अधिकाऱ्यांवर होणाऱ्या एकतर्फी अन्यायकारक कारवाई ‌विरोधात आंदोलन छेडले‌. यात मराठा सेवा संघ, कास्ट्राईब महासंघ, बहुजन शिक्षक संघटना,शिवसंग्राम पक्ष, उर्जिता महिला संघटना, आणि जागरुक नागरिक मंच यांच्या संयुक्त निवेदनाने व हजारो नागरीकांच्या स्वक्षऱ्यांचे निवेदन जिल्हाधिकार , जिल्हा पोलीस अधिक्षक व पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

या प्रकरणात शिष्ठमंडळाने पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. जागरुक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी कडक शब्दात खडसाऊन जाब विचारला. या प्रकरणात जातीने लक्ष घालून अन्याय होता कामा नये असे स्पष्ट सुनावले आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे. आज क्रीडाधिकारी नावंदे यांच्यावर आलेली अशी वेळ उद्या कुणावरही येऊ शकते. त्या त्या क्षेत्राचे मंत्र्याने बसल्या जागी कोणतीही शहानिशा न करता, कुठल्याही अधिकाऱ्यांविरुद्ध फोन करुन वाटेल तसे एकतर्फी, विना चौकशी आदेश द्यायला ही काही मोगलाई नाही. हि अनिष्ट प्रथा संपवली पाहिजे.

कसाब सारख्या जागेवर रेडहॅंड पकडलेल्या अतिगंभीर गुन्हेगाराला ही सरकारने स्वत: खर्च करून वकील देऊन, बाजू मांडण्यासाठी संधी दिली. आणि इथे तर ही हुकुमशाही होत आहे .असेही स्पष्टपणे पालकमंत्र्यांना सुनावले.

यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी सर्व संघटनच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेत या बाबत विचार करू असे आश्वासन दिले.

यावेळी जाणीव विद्यार्थी-पालक संघटनेचे बहिरनाथ वाकळे, बहुजन शिक्षक महासंघाचे रवींद्र पटेकर, टेबल टेनिस खेळाडू धनेश बोगावत आदींनी आपले विचार मांडले.

यावेळी मराठा सेवा संघाचे अभिजित वाघ, जिल्हा शिक्षक कृती समितीचे चंद्रकांत चौगुले, मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष बाळासाहेब वाकचौरे, बहुजन शिक्षक आघाडीचे विलास साठे, जागृत नागरिक मंचचे सचिव कैलास दळवी, कापड व्यापारी असोसिएशनचे राजेंद्र गांधी, इतिहास प्रेमी असिफ दुलेखान उर्जिता सोशल फाउंडेशनच्या संध्या मेढे, शरद मेढे आदी उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –