HBD M S Dhoni : महेंद्रसिंग धोनी एक ‘फिनिक्स’, ‘माही A To Z’

ADV

पोलिसनामा ऑनलाइन टीम : (विक्रम औटी) – कॅप्टन कुल, माही, एमएसडी या टोपण नावांनी प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये सगळ्याचा स्तरावर यश मिळवलेले आहे. एक वादळ अनपेक्षितपणे यावं, त्यानं सारं काही कवेत घ्यावं आणि अचानक कुठेतरी गुडूप व्हावं, असा काहीसा धोनीचा हा प्रवास राहिलेला आहे. धोनीने भारतीय चाहत्यांना आयुष्यभरासाठी असे काही आनंदाचे क्षण दिले आहेत कि, चाहते आयुष्यभर या क्षणांची पुंजी घेऊन आपला जीवनप्रवास करणार आहेत. मात्र त्याच्या या प्रवासामागे अनेक कष्ट आहेत, श्रम आहेत, त्याचबरोबर अनेक हितचिंतक आहेत. या प्रवासाची सुरुवात ध्यानात घ्यायची झाल्यास आपल्याला हा लेख कमी पडेल. आपण या लेखात धोनीचा हा जीवनप्रवास उलगडणार आहोत. या लेखात आपण धोनीच्या जीवनाच्या सुरुवातीचा आणि भारतीय संघापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत.

Image result for mahendrasingh dhoni hd images

ADV

धोनीचा सुरुवातीचा जीवनप्रवास –

धोनी हा मूळचा रांचीचा. एका साध्या मध्यमगर्वीय कुटुंबातला. मेहनती, हुशार, प्रामाणिक आणि आपल्या निर्णयांवर काहीही करून ठाम राहणारा. क्रिकेट हे त्याचे आयुष्य होतेच मात्र त्याचबरोबर त्याला इतर खेळांमध्ये देखील रुची होतीच. त्यामुळं लहानपणापासून धोनीचे क्रिकेटवर प्रेम होते. त्याचबरोबर त्याला भारतीय सैन्यात भरती होण्याची देखील फार आवड. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला भारतीय सैन्याच्या रंगाच्या गोष्टी आढळून येतात.

महेंद्रसिंग धोनीचं बालपण 

१) महेंद्र सिंह धोनीचा जन्म झारखंड मधील रांची येथे पान सिंह आणि देवकी सिंह यांच्या घरी ७ जुलै १९८१ रोजी झाला.

२) धोनी चा बालपण जास्तकरून खेळ खेळण्यातच गेला, त्याला त्याची आई, बहिण व मित्रपरिवार क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोस्ताहित करत असे.

३) धोनीला क्रिकेटबरोबरच बॅडमिंटन आणि फुटबॉल हे दोन खेळ देखील प्रचंड आवडायचे. त्यामुळे धोनीने फुटबॉलच्या प्रेमापायी आपले केसदेखील वाढवले होते.

४) लहानपणीच्या काळात धोनी क्रिकेटबद्दल जास्त सिरीयस नव्हता. बॅडमिंटन आणि फुटबॉल या दोन खेळांमध्ये त्याची जिल्हास्तरीय संघामध्ये निवड देखील झाली होती. लहानपण तो फुटबॉलमध्ये किपींग करायचा, यामुळेच त्याच्या प्रशिक्षकांनी त्याला क्रिकेटचा सामना खेळायला पाठवलं. मात्र त्याच्या विकेटकिपिंगने त्याने सर्वांना आकर्षित केले.

५) लहानपणापासूनच त्याला तीन व्यक्ती आदर्श वाटत राहिल्या, त्या तीन व्यक्ती म्हणजे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन, गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर. मात्र विकेटकिपिंग आवडत असल्याने ऑस्ट्रेलियाचा ऍडम गिलख्रिस्ट हा त्याचा विदेशी आवडता खेळाडू होता.

६) क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यानंतर महेंद्र सिंग धोनी याने आपले शिक्षण फार मनावर न घेतल्याने त्याने १२ वि पर्यंतच शिक्षण घेतले. त्यानंतर भारतीय संघात प्रवेश मिळाल्यानंतर त्याने आपले शिक्षण थांबवले.

Image result for mahendrasingh dhoni hd images

रणजी संघात प्रवेश –

धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात हि अंडर १९ मधून झाली. बिहारच्या अंडर १९ संघाकडून खेळताना त्याने बॅटिंगमध्ये काही विशेष कामगिरी केली नाही मात्र त्याच्या विकेटकिपिंगच्या बळावर त्याने बिहारच्या रणजी संघात प्रवेश मिळवला. बिहारकडून रणजी सामने खेळत असताना त्याने त्याच्या विकेटकिपिंग मधून त्याने सर्वांना आकर्षित करत एक फलंदाज म्हणून देखील नाव कमावले. त्याने बिहारकडून प्रथम श्रेणीचे जवळपास १३१ सामने खेळले. या सामन्यांत त्याने विकेटकिपिंगबरोबरच फलंदाज म्हणून देखील नाव कमावले. त्यामुळे अवघ्या काही वर्षांतच त्याने आपल्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. धोनीने बिहारकडून अनेक सामन्यांत संघाला विजय मिळवून देणारी कामगिरी केली. मात्र भारतीय संघात अनेक अनेक दिग्गज खेळाडू आणि विकेटकिपर असल्याने त्याला संधी मिळत नव्ह्ती. मात्र लवकरच त्याच्यासाठी हे दरवाजे उघडणार होते. २००२-०३ मध्ये भारतीय संघात प्रवेश मिळवल्यानंतर आपल्या कामगिरीने निवास समितीच्या सदस्यांचे लक्ष वेधून घेतले आणि २००४-०५ मध्ये भारतीय संघात प्रवेश मिळवला.

Image result for mahendrasingh dhoni hd images

भारतीय संघात प्रवेश –

धोनी बारावीच्या परीक्षेला बसला होता, २४ तासांवर परीक्षा होती, पण परीक्षेच्या आदल्या दिवशी क्रिकेटचा महत्त्वाचा सामना होता. त्याला काय करावे हे सुचेना. वडील शिस्तप्रिय असल्यामुळे त्यांना तो घाबरायचा, पण त्यांना सांगून सामना खेळायला जाणे शक्य नव्हते. मात्र त्याने या परिस्थितीत देखील तो सामना खेळण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागितली आणि वडिलांनी दिली देखील. त्यानंतर २००० साली धोनीला रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून नोकरी लागली होती. त्या वेळी धोनी रेल्वेच्या ‘क्वॉर्टर्स’मध्ये राहायचा. २०००-२००३ पर्यंत त्याने रेल्वेची नोकरी केली, कारण ही नोकरी करत असताना त्याला क्रिकेट खेळायला मिळायचे. मात्र धोनीने यावेळी कधी पूर्णवेळ क्रिकेट खेळाडू म्हणून खेळण्याचा विचार केला नव्हता. २००४ साली मुंबईतील एका जिमखान्यावर एक सामना खेळण्यासाठी धोनी गेला होता. त्यावेळी भारतीय निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर हेदेखील सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. धोनीची षटकारांची आतिषबाजी पाहून त्यांनी धोनीला भारतीय संघात प्रवेश दिला आणि इथून पुढे खऱ्या अर्थाने धोनीने इतिहास लिहायला सुरुवात केली. २००४-०५ च्या मोसमात भारतीय संघात प्रवेश मिळाल्यानंतर पहिल्याच वेळी त्याला भारतीय संघाबरोबर बांगलादेश दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली. त्या दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात धोनी शून्यावर आऊट झाला. मात्र त्याला तरीदेखील दुसऱ्या सामन्यात संधी देण्यात आली. या सामन्यात देखील त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर या मालिकेत त्याला विशेष कामगिरी करण्यात अपयश आले.

मात्र तरीदेखील त्याची पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली. या दौऱ्यात मात्र त्याने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करत खोऱ्याने धावा केल्या. या मालिकेत कर्णधार सौरव गांगुली याने त्याला पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या सामन्यात वर खेळण्याची संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने करत १४८ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर तो सामन्याआधी दूध पितो आणि पपई खातो अश्या प्रकारच्या रंजक कहाण्या ऐकायला मिळाल्या. त्यानंतर धोनीने आयुष्यात मागे वळून न पाहता भारतीय संघात कायमचे स्थान मिळवले आणि राहुल द्रविडच्या जागी अनेक वर्षांपासून शोध असलेल्या विकेटकिपरची जागा देखील भरून काढली. आयुष्यात अत्यंत कडक आणि सिरीयस असणारा धोनी मैदानात देखील तितकाच सिरीयस होता. भारतीय संघात कायमचे स्थान मिळाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी याने श्रीलंकेविरुद्ध एका सामन्यात १८३ धावांची धमाकेदार खेळी करताना सामन्यात विक्रमी दहा षटकारांचा पाऊस पडला होता.

त्यानंतर खऱ्या अर्थाने महेंद्रसिंग धोनीचा भारतीय संघातील एक खेळाडू म्हणून प्रवास सुरु झाला आणि पुढे त्याने भारतीय संघाबरोबरच सगळ्या क्रिकेट विश्वावर राज्य करण्यास सुरुवात केली.

भारतीय संघात प्रवेश मिळवल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने आपल्या कामगिरीने सर्वांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले. त्याच्या याच कामगिरीच्या बळावर त्याला सर्वच प्रकारांत भारतीय संघासाठी दरवाजे उघडे झाले. एकदिवसीय सामन्यांबरोबरच कसोटी आणि टी -२० या प्रकारात देखील धोनी भारतीय संघाचा नियमित सदस्य झाला.

धोनीच्या जीवनात सर्व काही सुरळीत चालू असताना तो मैदानावर जितका नम्रपणे वागतो तितकाच वैयक्तिक जीवनात देखील नम्र आणि शांत आहे. २०१० साली त्याने त्याची प्रेयसी साक्षी सिंग हिच्याशी लग्न केले. या लग्नाचा देखील त्याने कोणताही गाजावाजा केला नाही. त्याच्या लग्नाला मोजकेच लोकं उपस्थित होते.

Image result for mahendrasingh dhoni hd images

१) २००७ चा एकदिवसीय वर्ल्डकप –

भारतीय संघाचा नियमित सदस्य झाल्यानंतर धोनीचा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणजे २००७ साली विंडीजमध्ये झालेला वर्ल्डकप. मात्र या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला साखळी फेरीतच बाहेर पडावे लागल्याने अनेक दिग्गज खेळाडूंना याचा झटका बसला. या स्पर्धेनंतर भारतीय कर्णधार राहुल द्रविड याने कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपांडी कुणाची निवड कार्याची हा प्रश्न जेव्हा निवड समिती आणि बीसीसीआयसमोर आला तेव्हा सचिन तेंडुलकर याने महेंद्रसिंग धोनी याचे नाव सुचवले आणि तेव्हाचे बीसीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी या पदासाठी तरुण आणि नवख्या धोनीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र तरुण रक्ताच्या या खेळाडूने या जागेवर देखील आपले कौशल्य दाखवत सर्वांना आपले कौतुक करण्यास भाग पाडले.भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या समोर सर्वात मोठी स्पर्धा आली ती म्हणजे २००७ सालची आयसीसी २०-२० वर्ल्डकप.

Image result for mahendrasingh dhoni hd images

२००७ आयसीसी टी-२० वर्ल्डकप –

कर्णधारपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच धोनीला इतक्या मोठया स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत जेष्ठ खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर धिनीने तरुण रक्ताच्या खेळाडूंना घेऊन या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करताना या स्पर्धेच्या पहिल्याच पर्वाचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाकडून कोणतीही अपेक्षा नास्ता धोनीने आपल्या नेतृत्व कौशल्याने सर्व तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करत हि स्पर्धा जिंकली. हि स्पर्धा जिंकल्यानंतर मात्र धोनीने मागे वाळून न पाहता आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. एकदिवसीय सामन्यात देखील आपल्या कर्णधार पदाच्या कौशल्याने त्याने सर्वांना चकित करत या प्रकारात देखील एक एक पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. या स्पर्धेतीलएक किस्सा धोनी अनेक वेळा सांगत असतो पाकिस्तानचा संघ समोर होता आणि अंतिम षटक फार महत्त्वाचे होते. हे षटक संघातील सर्वात अनुभवी म्हणजेच हरभजन सिंगने टाकावे, अशी धोनीची इच्छा होती. पण हरभजनने अखेरचे षटक टाकण्यासाठी नकार दिला. त्यानंतर धोनीने जोगिंदर सिंगसारख्या नवख्या गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला. त्याच्यावर विश्वास ठेवला.

Image result for mahendrasingh dhoni hd images

२००८ मधील तिरंगी मालिका –

या वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेली तिरंगी मालिका गाजवली. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन संघात खेळवण्यात आलेली हि मालिका भारतीय संघासाठी ऐतिहासिक होती. या मालिकेतील दोन्ही अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पहिल्यांदाच विजय मिळवला. या मालिकेत देखील धोनीने आपल्या नेतृत्व कौशल्याने भारतीय संघाचा विजय सोपा केला. या मालिका विजयानंतर मात्र धोनीने आयुष्यात कधी मागे वळून पहिले नाही.

Image result for mahendrasingh dhoni hd images

२०११ एकदिवसीय वर्ल्डकप –

धोनीसाठी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सर्व काही सुरळीत चालू होते. अनेक मालिका देखील तो जिंकत होता. मात्र भारतात झालेला २०१ साचा एकदिवसीय वर्ल्डकप त्याच्यासाठी, भारतीय संघासाठी आणि एकूणच सर्व भारतीय क्रीडा रसिकांसाठी अविस्मरणीय ठरला. या स्पर्धेत भारतीय संघाने तब्ब्ल २८ वर्षानंतर विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत धोनीने सर्व दिग्गज खेळाडूंना बरोबर घेत आणि आपले नेतृत्व कौशल्य वापरत भारताचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर याला बक्षिस दिले. या स्पर्धेत अंतिम सामन्यात धोनीने ठोकलेला विजयी षटकार भारतीयांच्या मनात असा काही घर करून बसला आहे कि,, भारतीय तो क्षण आयुष्यभर बरोबर घेऊन जगणार आहेत. य सामन्यात धोनीने नाबाद ९१ धावांची खेळी करत अडचणीत असलेल्या भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले. या स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या विक्रमी कामगिरीत धोनीचा मोलाचा वाटा होता.

२०११ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनीने भारतीय संघाला एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवले. त्याचबरोबर कसोटी सामन्यांमध्ये देखील धोनीने भारतीय संघाला पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवले. २०१३ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील भारतीय संघाच्या विजयात धोनीचा मोलाचा वाटा होता. कसोटीमध्ये म्हणाल तर धोनी परदेशात जास्त यशस्वी झाला नाही. धोनीने ६० कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. मात्र त्यापैकी काहीच सामन्यात धोनीला यश मिळाले. एकदिवसीय सामन्यांत ज्याप्रमाणे धोनी यशस्वी झाला त्या तुलनेत कसोटीमध्ये यशस्वी झाला नाही. त्यामुळे अखेर त्याने २०१४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केली. शांत आणि कुणालाही काहीही कळू न देता धाडसी निर्णय घेणाऱ्या धोनीने हा निर्णय घेताना देखील त्याने कुणालाही काहीही न सांगता अचानक निवृत्ती स्वीकारत सर्वांना धक्का दिला होता. त्यामुळे आपल्या गूढ खेळीप्रमाणेच त्याच्या या निवृत्तीमागचा निर्णय देखील अखेर गूढच राहिला.

Image result for mahendrasingh dhoni hd images

२०१५ एकदिवसीय वर्ल्डकप –

२०११ च्या स्पर्धेचा विजेता असल्याने भारतीय संघाकडून या स्पर्धेत देखील धोनीच्या संघाने उत्तम कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. मात्र अखेर सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर मात्र धोनीला एकदिवसीय सामन्यांत आणि टी-२० सामन्यांत म्हणावी तशी कामगिरी करता न आल्याने अनेक वेळा त्याच्या निवृत्तीची मागणी करण्यात आली. मात्र बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून विरोधकांना उत्तर देणाऱ्या धोनीने यावेळी देखील आपल्या कामगिरीने उत्तर दिले. या स्पर्धेनंतर देखील दोन वर्ष त्याने कर्णधारपद सांभाळले.

Image result for mahendrasingh dhoni hd images

कर्णधारपदाचा राजीनामा –

कसोटी सामन्यातून ज्याप्रमाणे धोनीने निवृत्तीचा निर्णय अचानकपणे जाहीर केला होता त्याचप्रमाणे धोनीने जानेवारी २०१७ मध्ये इंग्लंडच्या मालिकेआधी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे २०१९ मधील वर्ल्डकप स्पर्धेआधी विराट कोहली याला वेळ मिळवा म्हणून त्याने कोणताही स्वार्थ न पाहता भारतीय संघाच्या हिताचा विचार करत त्याने राजीनामा देत एक खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाचे सगळ्या स्तरातून कौतुक करण्यात आले.

२०१७ मध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील महेंद्रसिंग धोनी याने एक खेळाडू म्हणून आपली कारकीर्द पुढे सुरूच ठेवली. या घडीला भारतीय संघात सर्वात जास्त अनुभवी आणि सर्व संघाला सांभाळून घेणारा खेळाडू हा महेंद्रसिंग धोनी हाच आहे. कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर देखील त्याच्या कामगिरीत काही फरक पडल्याचे दिसून आले नाही . काही सामन्यांत त्याची कामगिरी फलंदाज म्हणून नक्कीच खराब झाली आहे, मात्र विकेटकिपर म्हणीन तो आजही जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघात येणाऱ्या तरुण खेळाडूंना महेंद्रसिंग धोनी मार्गदर्शन देखील करत असतो. तरुण खेळाडूंसाठी धोनी प्रेरणादायी आहे. या वयात देखील तो तरुणांना लाजवेल अशी कामगिरी करत आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने फिनिशर म्हणून भूमिका बजावली आहे. भारतीय संघ संकटात सापडल्यास तारणहार म्हणून धोनीकडे पाहण्याची सर्व क्रिकेट रसिकांना सवय लागली आहे. त्यामुळे यापुढे देखील अनेक वर्ष धोनी प्रेक्षकांच्या आणि क्रीडा रसिकांच्या मनावर राज्य करणार आहे. अशा या क्रिकेटवेड्या आणि भारतीयांना क्रिकेटसाठी वेडे बनवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला त्याच्या ३८ व्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..
Image result for mahendrasingh dhoni hd images

महेंद्रसिंग धोनीबद्दल माहित नसलेल्या रंजक गोष्टी –

१) प्रत्येक सामना जिंकल्या नंतर स्टंप आठवण म्हणून घेणे हे धोनी चा छंद आहे.

२)२०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कसोटी मध्ये व्हाईट-वॉश देत हि कामगिरी करणारा पहिला संघ ठरला.

३)धोनीने २००८ व २००९ मध्ये आयसीसी एकदिवसीय प्लेअर ऑफ द इयर हा पुरस्कार मिळवला. हा पुरस्कार दोनवेळा मिळवणारा पहिला खेळाडू बनला.

४)धोनीला २००७ मध्ये राजीव गांधी खेल रत्न अवार्ड व २००९ मध्ये पदमश्री पुरस्कार मिळाला.

५)क्रिकेट, फुटबॉल आणि बॅडमिंटन प्रमाणे धोनीला मोटर रेसिंग ची देखील खूप आवड आहे, त्याने माही रेसिंग टीम नावाने एक टीम देखील खरेदी केली आहे.

६)धोनीने २००६ मध्ये पाकिस्तान विरुद्ध कसोटी मॅच खेळताना त्याच पहिलं शतक बनवलं होतं. त्याने ९३ बॉल्स मध्ये १४८ धावा बनवल्या व कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद शतक बनवणारा तिसरा विकेटकीपर फलदांज बनला.

७)महेंद्रसिग धोनी बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम चा देखील खूप मोठा फॅन आहे, जेव्हा जॉन चा धूम सिनेमा आला तेव्हा धोनीने देखील जॉन सारखे लांब केस ठेवले होते.

८)धोनी हा एकदिवसीय सामन्यांमधील असा एकमेव कर्णधार आहे ज्याने सातव्या क्रमांकावर फलदांजी करताना शतक बनवले होते. हा पराक्रम त्याने २०१२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना केला.

९)धोनीचा स्वतःचा ७ By MS Dhoni नावाचा परफ्यूम ब्रँड देखील आहे.

१०)महेंद्रसिंग धोनी सलग सहा वर्षे (२००८-१३) आईसीसी वर्ल्ड वन डे इलेवन टीम चा हिस्सा होता.

११)धोनीच्या आयुष्यावर २०१५ मध्ये M. S. Dhoni: The Untold Story नावाचा चित्रपट बनवला गेला, त्यामध्ये सुशांतसिंग राजपूत ने धोनीची भूमिका केली होती.

Image result for mahendrasingh dhoni hd images

महेंद्रसिंग धोनी याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील आतापर्यंतची कामगिरी

एकदिवसीय सामने –

एकूण सामने- ३४८

धावा-१०७२३

शतके-१०

सरासरी -५०.५८

कसोटी सामने –

एकूण सामने -९०

धावा -४८७६

शतके-६

सरासरी-३८.०९

टी-२० सामने –

एकूण सामने -९८

धावा -१६१७

शतके-०

सरासरी-३७.०७

Image result for mahendrasingh dhoni hd images

आयपीयल –

महेंद्रसिंग धोनी हा २००८ सालापासून आयपीयलमधील सर्वात लोकप्रिय टीम चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असून २०१६ आणि २०१७ या दोन वर्षी चेन्नईवर बंदी असताना तो रायजिंग पुणे सुपरजायंट या संघाकडून खेळला. या स्पर्धेत देखील तो सर्वात यासास्वी कर्णधार असून आजपर्यंत खेळवण्यात आलेल्या सर्व पर्वांच्या सेमीफायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने प्रवेश केला असून २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये त्यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाने प्रमाणावर यश मिळवले आहे.

लग्न झाल्यावर आता तुझ्या आयुष्यात काय बदल झाले असे विचारल्यावर सामन्यात पराभूत झालो तर घरी गेल्यावर शिकवणी घेतली जाते, असे मिश्कील उत्तर देणारा धोनी कोणत्याही प्रकारचे मद्यपान करत नाही. त्यामुळे या अशा हरहुन्नरी आणि शांत स्वभावाच्या धोनीला पुन्हा एकदा त्याच्या ३८ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपण या लेखमालिकेत विश्रांती घेत आहोत. आणखी काही वर्ष धोनी भारतासाठी खेळेल अशी आशा करत आपण या ठिकाणी थांबूयात.

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार

‘हृदया’च्या आरोग्यासाठी दररोज न्याहारी घेतलीच पाहिजे

‘या’ कारणामुळे येत पुरुषांमध्ये वंध्यत्व

लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची ‘अशी’ घ्या काळजी