home page top 1

आ.राहुल कुल यांच्या हस्ते २६ कोटी २९ लाख रु.च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या केडगाव परिसरामध्ये दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी सुमारे २६ कोटी २९ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले.

यावेळी आमदार राहुल कुल यांनी बोलताना आपण गेल्या साडेचार वर्षांमध्ये दौंड तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्ती व गावांमध्ये रस्ते, वीज व पाणी या सुविधांचा विकासाचा दृष्टिने अनेक योजना मार्गी लावण्यात यशस्वी झालो असून भविष्यातील नागरीकरण लक्षात घेत पायाभूत सुविधांचा विकासासाठी अधिकाधिक कामे मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही राहू असे त्यांनी सांगितले.
यावेळी केडगाव परिसरातील अनके नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

केडगाव परिसरात उद्घाटन व लोकार्पण केलेली विकासकामे पुढील प्रमाणे –

१) दौंड तालुक्यातील शिरुर न्हावरा चौफुला रस्ता (केडगाव ते चौफुला – १ किमी) (केडगाव ते खोपोडी – ३ किमी) – ५ कोटी ६० लक्ष
२) पारगाव ते हंडाळवाडी (केडगाव) रस्ता- ६ किमी रस्ता करणे – ३ कोटी ४६ लक्ष
३) राम ९ ते वाखारी केडगाव दापोडी नानगाव रस्ता (केडगाव ते वाखारी – २ किमी) (केडगाव ते बोरीपार्धी – २ किमी) – ३ कोटी
४) राष्ट्रीय महामार्ग ९ ते केडगाव रस्ता ३.५ किमी – २ कोटी ४० लक्ष
५) हंडाळवाडी ते पारगाव रस्ता २ किमी – ९३ लक्ष २० हजार
६) पारगाव हंडाळवाडी शिव रस्ता मुरूमीकरण – २ लक्ष ९९ हजार

केडगाव परिसरात भूमिपुजन केलेली विकासकामे पुढील प्रमाणे –

१) केडगाव पाणीपुरवठा योजना – ८ कोटी १६ लक्ष
२) केडगाव रामा ११८ ते खुटबाव पिंपळगाव रस्ता (केडगाव टोलनाका ते गलांडवाडी फाटा – ५ किमी) – ५ कोटी
३) रामा- ११८ ते खुटबाव पिंपळगाव खामगाव नांदुर सहजपुर रस्ता (केडगाव टोलनाका ते खुटबाव – ५ किमी) – १ कोटी ७३ लक्ष
४) देशमुखमळा अंतर्गत रस्ते – १० लक्ष
५) केडगाव हंडाळवाडी येथे सभामंडप बांधकाम – १० लक्ष
६) केडगाव देशमुखमळा अंतर्गत रस्ता – १० लक्ष
७) केडगाव स्टेशन अंतर्गत रस्ता – १० लक्ष
८) केडगाव येथील खुटबाव रोड ते शेळकेवस्ती रस्ता – ६ लक्ष
९) केडगाव पारगाव शिव रस्ता – ५ लक्ष
१०) देशमुखमळा दत्तमंदिर येथे व्यायामशाळा बांधकाम – ५ लक्ष
११) देशमुखमळा पठारवस्ती येथील दत्त मंदिर सभामंडप बांधकाम – ५ लक्ष
१२) केडगाव दलितवस्ती अंतर्गत रस्ता – ५ लक्ष
१३) धुमळीचामळा येथील सावतामाळी मंदिर परिसर शुशोभिकरण. – ४ लक्ष
१४) पाटील निंबाळकर वस्ती येथे सभामंडप बांधकाम – ४ लक्ष
१५) बारवकर मळा ते जगताप वस्ती येथे बंदिस्त गटार योजना – ४ लक्ष
१६) मुंजाबा मंदिर ते जोशी व्यायाम शाळेपर्यंत येथे रस्ता कॉक्रीटीकरण – ४ लक्ष
१७) आंबेगाव पुनर्वसन येथे सभामंडप बांधकाम – ४ लक्ष
१८) आंबेगाव पुनवर्सन येथे बंदिस्त गटार योजना – ३ लक्ष
१९) हंडाळवाडी पाणी पुरवठा विहीरीकडे जाणारा रस्ता वस्ती कॉक्रीटीकरण – ३ लक्ष
२०) हंडाळवाडी रोड ते आप्पा हंडाळ यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटकरण – ३ लक्ष
२१) हंडाळवाडी रोड ते गोफणे वस्ती कॉक्रीटकरण – २ लक्ष

आरोग्य विषयक वृत्त –

कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण का वाढतेय ?

दिवसभर उत्साहित राहण्यासाठी हे व्यायाम आवश्यक

मासिक पाळीदरम्यान या कारणांमुळे स्रियांचा मूड बदलतो

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत करा थोडे बदल

Loading...
You might also like