PM मोदींच्या नावावर सुद्धा काहीतरी असायला हवं, JNU चं नाव बदलून MNU : खा. हंस राज हंस यांची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच दिल्लीचे खासदार हंस राज हंस यांच्यामुळे JNU च नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. हंस राज हंस यांनी JNU बाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. ते म्हणतात, जेएनयूचं नाव बदलून MNU करावं, मोदींच्या नावावर देखील काहीतरी असल पाहिजे ना.

जम्मू – काश्मीरमधून कलम 370 हटवण्याबाबत हंस राज हंस यांनी आपलं मत व्यक्त करताना केंद्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. जे एन यु मध्ये शहिदांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयाचं कौतुक केलं आणि ते म्हणाले, प्रार्थना करा कि सगळे शांतीने राहतील आणि बॉबचा वापर करणार नाहीत. आमच्या पूर्वजांनी चुका केल्या त्याच आम्ही भोगत आहोत. त्यामुळे मी तर म्हणतो JNU च नाव बदलून MNU करा, मोदींच्या नावावर पण काहीतरी असलं पाहिजे ना. असे खळबळजनक विधान हंस राज हंस यांनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like