नगर तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रशासनाला जाब : आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासनाला आली जाग

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न जिल्ह्यात गंभीर झाला असतानाच प्रशासनाने काल नगर तालुक्यातील चारा छावण्या बंद करण्याचे तोंडी आदेश दिल्यानंतर आज त्याची अंमलबजावणी सुरु झाल्याने शेतकर्‍यांनी तहसिलदाराच्यादालना समोर जावून जाब विचारण्यास सुरवात केली आहे. छावण्या सुरु झाल्या नाहीत तर नगर – सोलापूर महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. यानंतर प्रशासनाने साकत गावात जाऊन परिस्थिती पाहिल्यानंतर तुर्त छावण्या बंद न करण्याचा निर्णय घेतला . यावेळी पंचायत समिती सभापती रामदास भोर, राजेंद्र भगत , प्रवीण गोरे, किशोर पवार, संपत वाघमोडे , माणिक गोरे , बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते

जिल्हयामध्ये जनावरांच्या छावण्यासाठी मोठी कसरत पहिल्यापासूनच सुरू आहे. एकीकडे दिलेल्या परवानग्या ह्या लाफितीच्या कारभारात अडकल्या होत्या परवानग्या घेण्यासाठी पहिल्या पासूनच मोठी कसरत करावी लागली होती. रडत खडत कशाबशा छावण्या सुरू झाल्या जिल्ह्यात साधारणतः ५०० छावण्या सुरू झाल्या होत्या. पाऊस पाणी नसल्यामुळे याठिकाणी जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करुन देण्यात आले होते. चार्‍याचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जिल्हयात चाराबंदी करण्यात आलेली असताना देखील यावर मार्ग निघण्यास तयार नाही.

जिल्ह्यात जरी पावसाने सुरवात केली असली तरी मात्र, सर्वत्र पावसाने हजेरी लावलेली नाही. आजही नगर तालुक्यातील अनेक गावे यामध्ये चिचोंडी, साकत, दहिगांव, रुईछत्तीशी , हात वळण, गुणवडी , वडगाव तांदळी आदींसह विविध भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पावसाची सुरवात झाल्या झाल्या प्रशासनाने ४४ छावण्या बंद केल्या होत्या. वास्तविक पाहता अद्याप अजून खरीपाच्या पेरणीला सुरवात झाली नसताना जिल्हा प्रशासनाने थेट छावण्या बंद करुन एक प्रकारे शेतकर्‍यांना अडचण निर्माण केली आहे.

दोन दिवसापूर्वीच शिवसेनच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन चारा छावण्या ह्या जुलै अखेर पर्यंत सुरु ठेवाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र, काल नगर तालुक्यातील छावण्या बंद कराव्यात असे तोंडी आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणी तात्काळ आज करण्यात आलेली आहे, संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी येथील तहसिल कार्याल्यासमोर जमा होवून तहसिलदारांना जाब विचारण्यास सुरवात केली आहे. जर तात्काळ छावण्यासुरु झाल्या नाही तर दुपारी चार नंतर सोलापूर महामार्गावर शेतकरी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर नायब तहसिलदार अभिजीत बारवकर यांनी साकत गावात जाऊन नेमकी परिस्थितीची पाहणी केली. चारा टंचाई असल्याने व समाधानकारक पाऊस नसल्याने चारा छावण्या तुर्त बंद न करण्याचा निर्णय घेतला.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

सौंदर्य प्रसाधनेसुद्धा वाढवतात मधुमेहाचा धोका ! घ्यावी ही काळजी

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी