जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर आंदोलन बंदी उपोषणकर्ते, आंदोलनकर्त्यांसाठी दुसरी जागा निश्चित

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे आवारात, कार्यालयासमोर उपोषण, धरणे, ठिय्या आंदोलन, मोर्चे करण्‍यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. उपोषणकर्त्यांना शांततेच्‍या व कायदेशीर मार्गाने उपोषण, आंदोलन करण्‍यासाठी सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने वरिष्‍ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या कार्यालयाजवळील शासकीय मोकळी जागा निश्चित करण्‍यात आली आहे. जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज हा आदेश जारी केला आहे.

जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे ठिकाण हे अत्‍यंत वर्दळीचे असून, या ठिकाणी मोर्चे, उपोषण, ठिय्या आंदोलनाकरीता उपोषणकर्ते जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या समोरच बसतात. या ठिकाणापासून शासकीय वाहन, अॅम्‍बुलन्‍स, शहरातील बाजारपेठेत जाणा-या इतर वाहनांपासून अपघात होऊ नये, म्‍हणून सदरचे ठिकाण हे उपोषण, आंदोलनासाठी प्रतिबंधात्‍मक घोषित करण्‍यात आले आहे. आंदोलनकर्ते यांना शांततेच्‍या व कायदेशीर मार्गाने उपोषण करण्‍यासाठी दुस-या ठिकाणी वरिष्‍ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर यांचे कार्यालयाजवळील मोकळी जागा निश्चित करण्‍यात आलेली आहे. त्‍याचा पत्‍यासहीत फलक जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोरील भिंतीला दर्शनी भागात लावण्‍यात आला आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील होणारे आंदोलन खरोखरच बंद होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी