विद्यार्थिनींना एसटीतून उतरून देण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील घटनेमुळे नागरिकांकडून संताप

अहमदनगर :  पोलीसनामा  ऑनलाईन – महाविद्यालयीन शिक्षणासाठी रांजणगाव देशमुख येथून कोपरगावला येणाऱ्या विद्यार्थिनीच्या पासवर आगार प्रमुखांनी शिक्काा मारला. कंडक्टरने तिला खाली उतरवून देण्याचा प्रयत्न केला. रस्त्यातच उतरण्याचा प्रयत्न झाल्याने मुलीला रडू कोसळले. आज कोपरगाव तालुक्यात घडलेल्या घटनेवरून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथून महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोपरगावला सदर विद्यार्थिनी दररोज एसटी बसने येते. त्यासाठी तिने महिन्याचा पास काढलेला आहे. बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीला बस कंडक्टरने पासवर शिक्का नसल्याचे कारण देत रस्त्यावर उतरून देण्याचा प्रयत्न केला. संबंधित विद्यार्थिनींकडे पैसे भरून काढलेला पास होता. मात्र, त्यावर शिक्का नसल्याने तिला बसमधून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनी रडू कोसळले.

आगार प्रमुखाने शिक्का न दिल्याने त्याची शिक्षा त्या विद्यार्थिनी भोगावी लागली. या घटनेचा कोपरगाव तालुक्यातून तीव्र निषेध होऊ लागले आहे.

सुंदर दिसायचय ? ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

‘झटपट मेकअप’ करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

किडनी आणि ह्रदय विकारावर द्राक्ष आहेत गुणकारी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like