भाद्रपद पौर्णिमा उत्साहात संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (चंद्रकांत चौंडकर) – पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. भाद्रपद पौर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कऱ्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले व अभिषेक करण्यात आला.

त्यानंतर ह.भ.प. दत्तात्रय महाराज सुळसकर (कासुर्डी) यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. त्यांना मृदुंग साथ तेजेस खेसे, राजगुरू महाराज यांनी दिली. गायक हभप दत्तात्रय बोरकर, चांगण महाराज, कोलते महाराज यांनी दिली. भजन साथ नायगाव ग्रामस्थ भजनी मंडळाने दिली. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापुजा पुजारी मनोज जगताप यांनी केली.

त्यानंतर आरती होऊन महाप्रसाद झाला. अशी माहिती हभप जयराम खेसे व हभप संतोष गायकवाड यांनी दिली. अन्नदान ज्ञानेश्वर धर्माधिकारी, शंकर वाळके, सुदाम वाळके, हिरामण येवलेे(पेरणे), विश्वनाथ लवांड (हिंगणिगडा), वामन कोलते (पिसर्वे) यांच्या वतीने करण्यात आले. मंदिर परिसराची स्वच्छता, लाईट, पाणी, दर्शनबारी आदिंची उत्तम व्यवस्था केली होती असे राहुल कड यांनी सांगितले.