अंक ज्योतिष 7 मार्च : ‘हा’ मुलांक असणार्‍यांना ‘धन’ प्राप्तीचा ‘योग’, ‘शुभ’ रंग आणि ‘लकी’ नंबरमुळं मिळेल यश

पोलीसनामा ऑनलाइन – ज्योतिष गणनेत एखाद्या व्यक्तीचा शुभांक त्या व्यक्तीच्या जन्मतिथीवरून काढला जातो. ज्यास मुलांक म्हटले जाते. मुलांक जन्मतिथीच्या अंकाच्या बेरजेतून येणार्‍या अंकाला म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीचा जन्म 22 एप्रिलला झाला आहे तर या तारखेच्या दोन्ही अंकांची बेरीज 2 + 2 = 4 येते, यास मूलांक म्हणतात. जर एखाद्याची जन्मतिथी दोन अंकांची म्हणजे 11 आहे तर त्याचा मुलांक 1 + 1 = 2 होईल. तर जन्मतिथी, जन्म महिना आणि जन्मवर्ष यांच्या एकुण अंकांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. जर एखाद्याचा जन्म 22- 04- 1996 ला झाला आहे. तर या सर्व अंकांच्या बेरजेतून येणार्‍या एका अंकाला भाग्यांक म्हटले जाते. 2 + 2 + 0 + 4 + 1 + 9 + 9 + 6 = 33 = 6 म्हणजे तुमचा भाग्यांक 6 आहे.

अंक – 1
दिवसभरात भरपूर काम असेल. आज भावनांवर नियंत्रण ठेवणे थोडे अवघड जाऊ शकते. आरोग्याबाबत थोडे अस्वस्थ होऊ शकता.
शुभ अंक- 13
शुभ रंग- निळा

अंक- 2
प्रेमात मधुर संबंध निर्माण होतील. योग, व्यायामाकडे वळाल. आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आपल्या क्षमतेने आज नवीन शोध लावाल. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक – 1
शुभ रंग – सफेद

अंक- 3
आज परिस्थितीला घाबरू शकता, म्हणून कोणतीही जोखीम घेऊ नका. महत्वकांक्षा ठेवा, परंतु विवेकाचाही योग्य वापर करा. धार्मिक कार्य आणि तिर्थस्थळांवर जाण्याचे योग आहेत.
शुभ अंक – 6
शुभ रंग – सफेद

अंक – 4
धैर्याने काम करा. आज तुमचे रूप लोकांना भ्रमित करू शकते. आज तुम्ही तुमच्या मेहनतीने नवीन प्रयोग करू शकता. जो करण्यासाठी सहकार्य मिळेल. जोशात येऊन घेतलेले निर्णय अडचणीत आणू शकतात.
शुभ अंक – 19
शुभ रंग – ग्रे

अंक – 5
तुम्ही एखादे मोठे काम पार पाडाल. ईश्वर आज तुमच्यासोबत आहे. आज मजेचा दिवस आहे. हॉटेल व्यवसायिकांसाठी आजचा दिवस खास आहे. तुमच्या बुद्धीचे कौतूक होऊ शकते. कौटुंबिक ताळमेळ न बसवल्याने पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. व्यापारात वाढ होऊ शकते.
शुभ अंक 17
शुभ रंग- क्रीम

अंक – 6
तुम्हाला इंटरव्ह्यू, परीक्षा इत्यादीमध्ये यश मिळू शकते. काही अडचणी येऊ शकतात. राजकीय कार्यात पूर्ण सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचे योग आहेत. संततीकडून काहीतरी खुशखबर येऊ शकते.
शुभ अंक -24
शुभ रंग – हिरवा

अंक – 7
शत्रूंना गारद कराल. विवाहाचे योग दिसून येत आहेत. मुलांसाठी जोडीदार शोधण्याचे काम सुरू राहिल. मुले व जोडीदाराकडून सुख मिळेल. तुमच्याकडे जे आहे, त्याबाबत संतुष्ट राहावे लागेल. धनप्राप्ती होऊ शकते.
शुभ अंक – 10
शुभ रंग- नारंगी

अंक- 8
एखादा मोठा खर्च अचानक येऊ शकतो. आज तुमचे सर्व लक्ष कुटुंबाकडे राहिल. आज तुमची इच्छापूर्ती होऊ शकते. अचानक धन प्राप्त होईल. रोमान्स, प्रेम, विवाह जी इच्छा असेल ती पूर्ण होईल.
शुभ अंक – 42
शुभ रंग – क्रीम

अंक- 9
तुमच्या कुटुंबात धार्मिक विधी होऊ शकतो. आजच्या दिवशी आरोग्य कमजोर राहू शकते. आज विरोधक तुमची प्रशंसा करतील. जुन्या आजारापासून सुटका मिळेल. बहिण-भावाच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.
शुभ अंक – 1
शुभ रंग – लाल