‘डायमंड-गोल्ड’च्या दागिन्यांनी नव्हे तर अभिनेत्री खा. नुसरतनं स्वतःला ‘सजवलं’ फुलांनी, सासरी होता मोठा ‘समारंभ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बंगालची अभिनेत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) खासदार बनलेल्या नुसरत जहांने पुन्हा एकदा आपल्या साधेपणामुळे चर्चेत आल्या आहेत. जेव्हा त्यांचे पती निखिल जैन यांच्या घरात म्हणजेच नुसरत यांच्या सासरी एका कार्यक्रमाचे आयोजन केले तेव्हा त्यांना सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांनी नव्हे तर फुलांच्या दागिन्यांनी सजवले होते. त्यांच्या या अंदाजामुळे पुन्हा लोक फिदा झाले. यापूर्वी संसदेत शपथ घेतल्यानंतर भाजपचे खासदार आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे पाय स्पर्श केल्यामुळे नुसरत खूपच चर्चेत आल्या होत्या.
Nusarat Jahan
जरी नुरासत जहाँ यांनी राजकारणात प्रवेश केला असला तरी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि त्यांच्या वागण्यामुळे त्या चर्चेत राहिल्या आहे. सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे – ‘कुटुंबासमवेत वेळ घालवताना प्रत्येक सेकंद खूप मोलाचा ठरतो. हे कौटुंबिक कार्य आहे. मी कुटुंबातील नवीन सून आहे.’

Nusarat Jahan
एक नवीन सून म्हणून नुसरतने यांनी त्यांचे काही अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. यापैकी सर्वात खास फोटो म्हणजे नुसरत यांचे दागिने … आपल्या कौटुंबिक कोणत्याही कार्यात सोन्याचे किंवा हिऱ्यांचे दागिने नव्हे तर फुलांचे दागिने घातले आहेत.
Nusarat Jahan
या फोटोंमध्ये नुसरत यांचे पती निखिल जैनसुद्धा दिसत आहेत. या फोटोंमध्ये नुसरत हे सोन्याची बॉर्डर असलेली गोल्डन ग्रीन साडीमध्ये दिसत आहे. मांग टीका ऐवजी त्यांच्या कपाळावर पांढर्‍या व लाल फुलांचा माला दिसते. त्याच्या गळ्यात फुलांच्या माळासुद्धा दिसतात. यापूर्वी नुसरत यांचे फोटो सोशल मीडियावर आले होते. त्यांच्या हनिमूनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी जेव्हा नुसरत जहां यांनी सोशल मीडियावर आपल्या हनिमूनचे फोटो शेअर केले होते, त्याच दिवशी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले होते.