पुण्याच्या न्यायालयात ‘पानिपत’ चा वाद !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास चुकीचा आणि दिशाभूल करणारा असून मराठा सरदारांचा उल्लेख केल्याशिवाय पानिपतचा रणसंग्राम पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून सदरील पानिपत चित्रपट प्रदर्शित करून नये म्हणून पुणे जिल्हा दिवाणी न्यायालय येथे पानिपत चित्रपटावर स्थिगिती (स्टे) संदर्भात सरदार महादजी शिंदे यांच्या परिवारातील उत्तमराव शिंदे सरकार यांनी याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांचे वकील अ‍ॅड. अश्विन मिसाळ यांनी या संदर्भात अशी माहिती दिली. ते पुढे म्हणाले कि या याचिकेवर २ डिसेंबर रोजी पुणे दिवाणी कोर्टात सुनावणी होणार आहे.

pune-patrakar

त्याच बरोबर शिंदे यांचे दुसरे वकील अ‍ॅड. वाजिद खान बीडकर यांच्या वतीने चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, कलाकार व लेखक यांना कायदेशीर नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे बंधू इंद्रजित शिंदे उर्फ शिंद्धीया (ग्वालेहर) तसेच मस्तानीचे आठवे वंशज नवाब शादाब अली बहादूर (भोपाळ) तसेच देशभरातील सरदार घराणी तसेच जनसामान्य लोकांतून उत्तमराव शिंदे सरकार यांना पाठींबा दिला आहे.

चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांने व दिग्दर्शक यांनी सदाशिवराव भाऊ या खोटी आणि चुकीची व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाहीत. मराठा सरदारांचा इतिहास डावलून पानिपतचा इतिहास होऊच शकत नाही. त्यामुळे अशाप्रकारे मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न करून चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही चित्रपटगृहात पानिपत चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा सर्व सरदारांच्या व शिंदे सरकार परिवाराचे उत्तमराव शिंदे सरकार यांनी दिला आहे.

दत्ताजी शिंदे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांच्या शिवाय पानिपत बनतोच कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित करण्यात आला आहे. पानिपतचा नायक कोणीही एक नसून दत्ताची शिंदे यांच्यासोबतच जनकोजी शिंदे, मल्हारराव होळकर, महादजी शिंदे , विश्वासराव पेशवा, इब्राहिम खान गारदी यांच्यासह ४८ हून अधिक मातब्बर घराणी व महाराष्ट्रातील संपूर्ण समाज आहे. एकही लढवय्या मराठ्याचे नाव नसून विशिष्ट समूहाचे उदात्तीकरणासाठी अस्सल मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

दत्ताजी शिंदे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना रयतेसाठी ‘बच्चेंगे तो और भी लढेंगे’ असे बाणेदारपणे शत्रूला ठकावून सांगणारे दत्ताजी शिंदे ट्रेलर मध्ये का नाहीत..? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर रयतेसाठी व स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे व सदैव झटणारे महादजी शिंदे हे जगातील महान योद्धा व शक्तिशाली व्यक्ती होती. मराठ्यांचा झेंडा अटकेपार लावणारे असे त्यांचे व्यक्तिमत होते.

Visit : Policenama.com