शारिरीक आरोग्यासह मानसिक आरोग्यकडे लक्ष द्यावे : SDPU प्रकाश एकबोटे

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी शहरातील पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.01) जुलै रोजी पाथरी, सेलुचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे, पोलिस उपनिरीक्षक टोपाजी कोरके, ठाणे अंमलदार फड, पोलिस कर्मचारी कालापाड, बर्गे, शेख मुन्ना, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आजचे युग हे धावते जग आहे, यासाठी प्रत्येकाने शारिरीक आरोग्यासह मानसिक आरोग्यकडे लक्ष द्यावे. स्पर्धेच्या युगात मानसिक तनाव मुक्तीसाठी योग, ध्यान, प्रार्थना करावी. तनावाचे व्यवस्थापन करताना प्रत्येकाने आपल्या कुटुंबाशी संवाद साधला पाहिजे. नाना प्रकारच्या व्यवसायांनी मानसाचे आरोग्य बर्बाद होते तसेच आर्थिक नुकसान ही होते. यासाठी व्यसनापासून दुर रहावे.

सजग नागरिक यानात्याने कायदा पाळून सुव्यवस्था राखणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले, पोलिसांनी शहरातील रस्त्यांवर पार्किंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी उपाय योजना करून अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावे. वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, झाल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. प्रवास करत असताना आपल्या मौल्यवान वस्तूंची, लहान मुले यांची काळजी घ्यावी अनोळखी इसमाकडुन कुठल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ स्वीकारु नका. असे ते म्हणाले.

बोलताना पुढे ते म्हणाले, निसर्गाचा समतोल राहणे काळाची गरज आहे यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करायला हवे यासाठी प्रयत्न केला पाहीजे. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्याकडे लक्ष देऊन काळजी घ्यावी. असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रकाश एकबोटे यांनी केले.

यावेळी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्र्ष्टाचार ,सभापतींचे चौकशीचे आदेश

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

You might also like