आघाडीच्या जागा वाटपासाठी १६ जुलैचा ‘मुहूर्त’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची येत्या १६ जुलै रोजी बैठक होणार असून त्यात मित्रपक्षांबाबत तसेच त्यांना कोणत्या जागा सोडायच्या यावर चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी बैठक आज पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले , विधानसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. येत्या १६ जुलैला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकत्र बैठक होईल. यामध्ये दोन्ही पक्षातील जागावाटप तसेच कोणत्या जागा मित्रपक्षांना सोडायच्या याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीदेखील काँग्रेससोबत यावी, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘हायकमांड’च्या मान्यतेनुसार मनसेला घेणार
काँग्रेसच्या प्रमुख सोनिया-गांधी आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंची भेट ईव्हीएम मशीनसंदर्भात होती. मनसे आणि काँग्रेसमध्ये वैचारिक फरक आहे. त्यामुळे हायकमांडच्याच मान्यतेने मनसेला विधानसभा निवडणुकीत सोबत घेऊ असेही अशोक चव्हाण म्हणाले.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like