‘या’ कारणामुळे राखी सावंतशी होते मौनी रॉयची तुलना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुलतान सलमान खानने आपल्या मित्रांसाठी भारत चित्रपटाची स्क्रिनिंग केली होती. या स्क्रिनिंगनंतर कलाकारांचा रिव्हू खूपच चर्चेत आला पण त्याहून जास्त चर्चेत आली ती म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय.. मौनीने साधेच कपडे घातले होते तरीही तिचा चेहरा वेगळा दिसत होता. तिचे ओठ मोठे दिसत होते. यामुळे मौनी इन्स्टाग्रामवर खूपच ट्रोल झाली. सोशल मिडियावर लोक तिला ‘पुन्हा ओठांची सर्जरी केली का’ ? असे म्हणू लागले. आता ती खूपच विचित्र दिसत आहे.

सोशल मिडियावर यूजर्सने ‘प्लास्टिक सर्जरीमुळे मौनीच्या सुंदरतेचे नुकसान झाले’, ‘तिच्या ओठांना काय झाले’, ‘सर्जरी फेल गेली’ असे वेगवेगळे कमेंट करु लागले. एका युजरने मौनी रॉयची तुलना राखी सांवतशी केली. तिच्यावर अनेकप्रकारचे ट्रोल होत आहे.

एका ठिकाणी मौनीच्या लुकवर नाराज लोकांची गर्दी होती तर एका ठिकाणी काही असे चाहते होते जे तिला सपोर्ट करत होते. त्यांचे म्हणणे असे होते की, मौनी खूपच सुंदर आहे. त्यांनी लिहले की, आम्हाला कळत नाहीये की, मौनीला लोक जज का करत आहे ? ते आपल्या कामाशी काम का ठेवत नाही. तिचे शरीर आहे त्यामुळे तिला हवे ते ती करेल.

मौनी रॉय ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कलाकार आहे. आता तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने २०१८ मध्ये ‘गोल्ड’ चित्रपटातून पदार्पण केले होते. ती लवकरच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.