…म्हणून रोहित शेट्टीनं सर्वांसमोर मागितली ‘बेबो’ करिनाची ‘माफी’

पोलीसनामा ऑनलाइन – हि घटना आहे गोलमाल-3 च्या वेळेची अभिनेत्री करिना कपूर आपल्या गोलमाल-3 च्या प्रमोशन साठी म्युझिक रिऑलिटी शो मध्ये भाग घेण्यासाठी गेली होती. तेव्हा शो च्या सुत्रसंचालकाने सरप्राईज देताना एका जेष्ठ नागरीकाला मंचावर बोलावले. व्हिलचेअवर असलेल्या जेष्ठ नागरिकाविषयी सांगण्यात आले होते की, करिनाचे आजोबा स्वर्गीय राज कपूर यांचे ते सहकारी रामप्रसाद गोयनका आहेत. ज्यांनी करिनाला आपल्या मांडीवर खेळवले आहे. गोयनका साहेब यांनी राज कपूर यांच्या सोबत आग सिनेमा पासून सत्यम शिवम सुंदरम पर्यंत सोबत काम केले आहे. आज रामप्रसाद गोयनका हालाखीची जीवन जगत आहेत. म्हणुन त्यांना मदत म्हणून 8 लाख रुपयांचा चेक करिना कपूरच्या हस्ते देण्यात येणार होता.

करिना कपूर त्यावेळी खूप भाऊक झाली आणि रामप्रसाद गोयनका यांच्या हातात 8 लाख रुपयांचा चेक तिने दिला. तेव्हा चेक हातात घेतल्यावर रामप्रसाद यांच्यामध्ये स्पूर्ती आली व ते डगमगत आपल्या व्हिलचेअरवरून उठले व नागिन डान्स करायला लागले. तेव्हा करिनासोबत असलेले अजय देवगन व साजिद वाजित ते बघुन हैराण झाले. डान्स करताना रामप्रसाद यांनी आपला मेकअप उतरवला तेव्हा ते निघाले कॉमेडियन व्रजेस हिरजी. व्रजेसला बघून करिना त्याला मारायला निघाली तेव्हा मध्येच रोहित शेट्टी आला व त्याने सांगितले की हा प्लॉन होता, मस्करी होती. आणि अशाप्रकारे रोहित शेट्टीने सर्वांसमोर करिनाची माफी मागितली. अशी मस्करी खर तर रोहितने नको करायला होती. पण करिनाने रोहितला माफ केले आणि म्हणाली बरे झाले मी व्रजेसच्या पाया नाही पडली, कारण चेक दिल्यानंतर मी तथाकथील रामप्रसाद गोयनका यांच्या पाया पडणार होती.