कलम 370 रद्द केल्याच्या समर्थनार्थ कॅनडातील भारतीय रस्त्यावर, केली घोषणाबाजी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर संपूर्ण भारत देशाने त्याचे स्वागत केले होते आणि देशभर आनंद साजरा करण्यात आला होता. आता भारताबाहेरील राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुद्धा याबाबतच्या प्रतिक्रिया द्यायला सुरवात केली आहे. कॅनडातील भारतीय नागरिकांनी याबाबतचा आपला आनंद रस्त्यावर उतरून व्यक्त केला आहे.

Image

कॅनडात राहणाऱ्या २५० भारतीय नागरिकांनी काल थेट रस्त्यावर उतरून प्रदर्शन करत ३७० हटवल्याचा आनंदोत्सव साजरा केला. कॅनडामधील ओत्तवा येथील पार्लमेंट पासून ते सिटी हॉल पर्यंत १८ ऑगस्ट रोजी हातात फलक घेऊन भारतीय नागरिकांनी जोरदार प्रदर्शन केले. यावेळी ओत्तवाचे महापौर जिम वॉटसन आणि कॅनडा मिनिस्टर लिसा मॅकलेडो यांनी धवजवंदनाला उपस्थिती लावली.

Image

यावेळी रस्त्यावर उतरलेल्या भारतीय नागरिकांनी हातात ३७० कलम रद्दचे बोर्ड घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच यावेळी कॅनडियन नागरिकांनी मोदी आणि शहांच्या अभिनंदनाचे फलकही पाहायला मिळाले. नागरिकांनी यावेळी ओपन टेम्पोमध्ये थांबून घोषणाबाजी केली.

Image

पाकिस्तानच्या नागरिकांकडून भारताबाहेर या निर्णयावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली होती मात्र आता परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुद्धा रस्त्यावर उतरून समर्थन व्यक्त करयाला सुरुवात केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-