शिरूर नगरपरिषदेसमोर बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन सुरू

शिरुर : पोलीसनामा (धर्मा मैड) – शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल व स्विकृत नगरसेवक विजय दुगड हे शिरुर नगरपरिषदेत लोकशाही प्रक्रियेला वेठीस धरत असल्याचा आरोप शिरुर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी केला आहे. शिरुर नगरपरिषदेसमोर आज दि. १५ जुलै २०१९ पासुन रविंद्र धनक यांनी बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

शिरुर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी
शिरूर नगरपरिषदेने विशेष सभा घेऊन सर्वे नंबर ११४० या जागेवरील आरक्षण काढणारा ठराव करावा आणि जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासन, नगर विकास खात्याचे संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वनखात्याचे अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वे नंबर११४० पैकी एक हेक्टर सरकारी जागेमध्ये शैक्षणिक उपक्रमाला तात्पुरती जागा द्यावी, संडास बाथरूम उभारणी करिता जागा द्यावी व पाण्याचे कनेक्शन द्यावे. या मागण्यांसाठी बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष नसीम खान, नगरसेवक मंगेश खांडरे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इक्बाल भाई सौदागर, मोहम्मद हुसेन पटेल, सुभाष छाजेड, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मेहबूब सय्यद, अनिल बांडे संजय बांडे, संदीप कडेकर, एजाज बागवान, अमित पंडित, योगेश ओहाळ, महेंद्र परदेशी, सिद्धेश्वर बगाडे, तारुक्का पठारे यासह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या