सावकारी पैशाच्या वादातून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे ZP सदस्यासह ३ जणांवर गुन्हा दाखल

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – सावकारकीच्या पैशावरून शिवीगाळ दमदाटी केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभुल लुंकड,शशांक लुकंड, यांच्या सह पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र रणजीत जगदाळे या तिघांचा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार दीपक रामदास पाचर्णे रा.कर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाचर्णे हे रांजणगाव एमआयडीसीत नोकरीला आहेत. त्यांचे बंधू सुधीर दीपक यांनी घर बांधण्यासाठी सन २०१६ मध्ये गावातील खाजगी सावकार प्रभुल लुंकड यांच्या कडून कर्ज घेतले होते. त्यावेळी १० रुपये टक्के दरमहा व्याज दराने पैसे देतो असे सांगून त्या मोबदल्यात पाचर्णे यांच्या कडील घेतले. त्यानुसार जुलै २०१६ मध्ये पहिल्या टप्प्यात चार लाख रुपये व डिसेंबर २०१६ मध्ये दुस-या टप्प्यात ३ लाख्र रुपये दीपक पाचर्णे यांनी प्रभुल लुकंड यांच्या कडून आणली होती. पाचर्णे यांनी सर्वे नंबर २४८ मधील ११ लाख्र रुपये किमंतीची २० गुंठे जमीन खरेदीखताने नावावर करून दिली होती. शशंक यांचा नावाने या जमिनीचे खरेदीखत करण्यात आले होते. या पैसाचे ६ लाख रुपये इतके व्याज त्यांनी दिले असून जमिनीचा ताबा पाचर्णे यांचा कडे आहे. आर्थिक अडचणी मुळे पाचर्णे यांना पैसे देता येत नव्हते. शशांक यांनी हे पैसे राजेंद्र रणजीत जगदाळे यांच्या कडून घेवून दिल्याचे पाचर्णे यांना शशांक लुकंड यांनी सांगितले.

२० जून २०१९ रोजी प्रभुल लुकंड, शशांक प्रभुल लुंकड, राजेंद्र रणजीत जगदाळे, हे पाचर्णे यांच्या घरी आले. व्याज व मुद्दल मिळून १७ लाख रुपये देवून टाका आणि खरेदीखत उलटून घ्या असे सांगत आठ दिवसाचा आत व्यवहार पूर्ण केला नाही तर जेथून असेल तेथुन उचलून घेवून जाण्याची धमकी पाचर्णे यांना दिल्याचे फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे.

२७ जून २०१९ ला पुन्हा धमकी दिल्यामुळे लुंकड आणि जगदाळे यांच्या भीती पोटी ते घरातून निघून गेले होते. पाचर्णे यांच्या घरामध्ये पैशाच्या कारणावरून भांडणे सुरु झाली होती. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा ही प्रयत्न पाचर्ण यांनी केल्याचे सांगत १५ जून २०१९ ला लुंकड व जगदाळे या तिघांनी सावकारी पैसाव्र्रून मारहाण व शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात पोलीस हवालदार खोमणे अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान या तिघांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ