शिरुर नगरपरिषदेसमोर उद्यापासुन बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर नगरपरिषदेने विशेष सभा घेऊन सर्वे नंबर ११४० या जागेवरील आरक्षण काढणारा ठराव करावा आणि जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासन, नगर विकास खात्याचे संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, वनखात्याचे अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वे नंबर ११४० पैकी एक हेक्टर सरकारी जागेमध्ये शैक्षणिक उपक्रमाला तात्पुरती जागा द्यावी. संडास बाथरूम उभारणी करिता जागा द्यावी व पाण्याचे कनेक्शन द्यावे या मागणीसाठी शिरुर येथील कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक उद्या सोमवार दिनांक १५ जुलै २०१९ पासून शिरूर नगरपरिषदेच्या दरवाजात बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन करण्यास बसत आहेत.

याबाबत माहिती देताना कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी सांगितले की, शिरूर नगरपरिषदेने सरकारी जागा सर्वे नंबर ११४० यापैकी काही जागा कृषीलोक विकास संशोधन संस्थेला मिळावी म्हणून १४ जुलै २००३ रोजी ठराव केला. ही जागा शैक्षणिक प्रयोजना करता विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आली. तरीही या जागेतून रस्ता करण्याच्या विरोधात दिनांक २४मार्च २००८ रोजी पंधरा दिवसाचे आंदोलन करावे लागले. त्यावेळेस समाजसेवक अण्णा हजारे व तत्कालीन जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हस्तक्षेप करून रस्त्याचे काम थांबविले.

नगरपालिकेने दिनांक १७ एप्रिल २०१० रोजी या जागेवर फळे व भाजीपाला मार्केटचे आरक्षण टाकले. सन२०१०पासून आरक्षण काढावे म्हणून सर्व सनदशीर मार्गाचा आम्ही अवलंब केला, त्यानंतर शिरुर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिनांक ९मे २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून नगरपालिकेने आरक्षण काढावे असे कळविले. परंतु दिनांक ५ ऑक्टोबर २०१६रोजी लोकांनी निवडून दिलेल्या सेवकांना नगरसेवकांना विश्वासात न घेता या विषयावर जी चर्चा झाली नाही, ती ठरावात लिहून केलेला ठराव रद्द करण्यात आला. असा ठराव रद्द करण्यात आला. ज्याला सरकार व महसूल प्रशासनाची शिफारस असुनही या शैक्षणिक उपक्रमाला जागा देण्यात आली नाही.

नगरपरिषदेच्या या धोरणामुळे सोळा वर्ष हा प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी दिली.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा