‘या’ ३ हजार शिक्षकांच्या होणार ‘ऑनलाइन’ बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील ३ हजार २८५ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार आहे.

यामध्ये २ हजार २१५ उपाध्यापक, २८० पदवीधर आणि ८१ मुख्याध्यापकांचा समावेश आहे. मागील वर्षी राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या होत्या. यंदाही या पद्धतीने बदल्या होणार असून शिक्षण विभागाने कार्यवाहीस सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील सुमारे ३ हजार २८५ शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाने ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करुन हरकती मागवल्या होत्या. त्यानंतर आता अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अवघड क्षेत्रात ३६८ शाळा आहेत. सलग १० वर्षे व एकाच शाळेवर तीन वर्षे मराठी माध्यमात झालेल्या शिक्षकांची बदली होणार आहे. यंदा देखील मोठ्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडून नियोजन केले जात आहे.