शाळा स्तरावरचा ‘अखर्चित’ निधी जमा करण्याचे आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील तालुका, केंद्र आणि शाळास्तरावर अखर्चित असणारा निधी तत्काळ जिल्हास्तरावर जमा करण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा निधी जमा केल्यानंतर पुढे २०१९-२० या वर्षात मंजूर उपक्रमांसाठी निधी वितरीत करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.

समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुका, केंद्र व शाळा स्तरावर अखर्चित असणारा निधी जिल्हास्तरावर जमा करुन घेण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कार्यवाही करत गटविकास अधिकाऱ्यांना निधी जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेंतर्गत तालुकास्तरावर अनुदान दिले जाते. बऱ्याच वर्षांपासून अनुदान वितरीत करण्यात येत आहे. या अनुदानाचे समायोजन करुन शिल्लक अनुदानाचा भरणा २२ जूनपर्यंत जिल्हा कार्यालयात करावा, असे आदेशात म्हटले आहे.

विलंब झाल्यास मंजूर उपक्रमांना निधी नाही

अखर्चित निधी मुदतीत जमा करण्यास विलंब झाल्यास मंजूर उपक्रमांसाठी निधी दिला जाणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. यासाठी वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना दिलेल्या मुदतीत अखर्चित निधी जिल्हास्तरावर जमा करावा लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय