Whats App : आता लवकरच येणार फिंगरप्रिंटचा ऑप्शन

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था – तुमच्या स्मार्टफोनला फिंगरप्रिंट असले तरी त्याने व्हाॅट्सअ‍ॅप लाॅक किंवा अनलाॅक होईलच असे नाही. काही स्मार्टफोनमध्ये तशी सुविधा आहे तर काही स्मार्टफोनमध्ये तशी सुविधा अजिबात नाही. जर तुमच्या स्मार्टफोनमधील व्हाॅट्सअ‍ॅप फिंगरप्रिंटने लाॅक-अनलाॅक होत नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की, लवकरच आता याबाबतचे नवे फिचर येणार आहे. त्यामुळे तुमचे व्हाॅट्सअ‍ॅप आता अधिकच सुरक्षित होणार आहे.
व्हॉटस् अ‍ॅपच्या नव्या फिचर्सवर नजर ठेवणार्‍या ‘वाबेटाइन्फो’ने म्हटले आहे की, अँड्रॉईड यूजर्सना लवकरच हे नवे व्हॉटस् अ‍ॅप फिंगरप्रिंट ऑथेन्टकॅशन ऑप्शन मिळेल. त्यामुळे सिक्युरिटी वाढून यूजर्सना आपले चॅट दुसरे कुणी वाचणार नाही किंवा त्याचा दुरुपयोग करणार नाही, याची खात्री मिळेल.
आयओएससाठी फेस आयडी आणि टच आयडी इंटिग्रेशनसाठी काम केल्यानंतर मेसेजिंग अ‍ॅपने अँड्रॉईड यूजर्ससाठी व्हॉटस् अ‍ॅप फिंगरप्रिंट ऑथेन्टकॅशनवर काम सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. मेसेजिंग अ‍ॅपने अँड्रॉईड 2.19.3 अपडेट करण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅप बेटा रोल आऊट केला आहे. त्यामध्ये अँड्रॉईड यूजर्ससाठी नवे फिंगरप्रिंट ऑथेन्टकॅशन फिचर दिसून येणार असल्याची बाब समोर आली आहे.

त्यामुळे लवकरच आता तुमचे व्हाॅट्सअ‍ॅप फिंगरप्रिंटने लाॅक-अनलाॅक होईल यामुळे तुमचे चॅट अधिकच सुरक्षित होतील आणि त्यांना इतर कोणी वाचू शकणार नाही.