खुशखबर ! ‘या’ दिवशी मान्सून महाराष्ट्रात पोहचणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य माणूस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहे. तो मान्सून पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. याबाबत पुणे वेधशाळेने माहिती दिली आहे. ‘वायू’ चक्रीवादळामुळे मान्सून महाराष्ट्रात येण्यास विलंब झाला होता. मात्र आता मान्सून येणार असल्याने बळीराजा देखील या पावसाने सुखावणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडल्याने पाणी उपलब्ध नव्हते. माणसांप्रमाणेच जनावरांना देखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध नव्हते. मात्र या सगळ्यात शासनाने चारा छावण्या सुरु ठेवल्याने जनावरांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळत होता. मान्सून हा अठरा जूनपर्यंत राज्यात धडकणार असून त्यानंतर दोनच दिवसात तो संपूर्ण राज्यात सक्रिय होऊ शकतो. त्यानंतर तो पुढील पाच ते सात दिवस सलग कोसळणार असून सर्वांनी सतर्क राहावे. अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या काही भागात पावसाच्या हलक्या सारी कोसळत असून पुढील चार पाच दिवसात मान्सून महाराष्ट्रात संपूर्णपणे सक्रिय होईल. सध्या मान्सून कर्नाटकमध्ये असून दोन दिवसात तो महाराष्ट्राकडे वाटचाल करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला असताना लांबलेला पाऊस राज्यात सक्रिय होणार असल्याने काहीशी चिंता आता दूर झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

सिने जगत –

उभारला ‘गेम ऑफ थोन्स’चा महाल, झाली गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद

‘या’ टॉप ५ अभिनेत्री अति ‘गर्विष्ट’पणा, ‘वाईट’ वागणुकीसाठी ओळखल्या जातात, घ्या जाणून

बांगलादेशाची ‘सनी लिओनी’ देत आहे बॉलिवूडच्या अभिनेत्रींना ‘टक्‍कर’, पहा फोटोज्

‘या’ खास कारणामुळे ‘छपाक’मधील लक्ष्मीच्या रोलसाठी दीपिकाचीच निवड !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like