NGT Imposes Fine On Ekta Housing Pvt. Ltd | पुण्यातील एकता हाउसिंग प्रा. लि. कंपनीला हरित लवादाचा दणका ! ठोठावला 15 कोटी 99 लाखांचा दंड; बांधकाम बंद करण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – NGT Imposes Fine On Ekta Housing Pvt. Ltd | बांधकामासाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (Maharashtra Pollution Control Board) पूर्व संमती न घेता आणि बेकायदेशीर बांधकाम (Illegal Construction) चालू ठेवणाऱ्या पुण्यातील (Pune Crime) एकता हाउसिंग प्रा. लि. कंपनी (Ekta Housing Pvt. Ltd.) कंपनीला राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) 15 कोटी 99 लाखांचा दंड ठोठावला आहे. एकता हाउसिंग कंपनीचे उंड्री (Undri) येथे रहिवासी प्रकल्प सुरु असून कंपनीने कायद्याचे उल्लंघन केले. हरित लवादाने दंड ठोठावताना नुकसानीच्या ताळेबंद स्वरुपात मांडलेली वरील रक्कम भरपाई करुन पर्यावरण पूर्ववत करेपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित विभागाकडून परवानगी मिळेपर्यंत बोरिंगचे पाणी आणि डीजी सेट वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. (NGT Imposes Fine On Ekta Housing Pvt. Ltd)

 

एकता हाउसिंग कंपनीचा पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील उंड्री गावामध्ये एकता कॅलिफोर्निया (Ekta California) नावाचा रहिवासी प्रकल्प (Residential Project) आहे. हा प्रकल्प सुरु करण्यासाठी कंपनीने 2007 मध्ये पुणे महापालिकेची पहिली परवानगी घेतली. परवानगी घेतल्यानंतर कंपनीने प्रकल्प रचनेमध्ये वेळोळेळी सात बदल करुन जास्तीचे बांधकाम केले. बांधकामाचे क्षेत्रफळ 20 हजार चौरस मीटरपेक्षा जास्त असताना पार्यावरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक असतानाही घेतली नाही. याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची बांधकामासाठी आवश्यक असलेली पूर्व संमती देखील घेतली नाही आणि बेकायदेशीररीत्या बांधकाम सुरु ठेवले. (NGT Imposes Fine On Ekta Housing Pvt. Ltd)

याबाबत पर्यावरण कार्यकर्ते तानाजी गंभीरे (Environmental Activist Tanaji Gambhire) यांनी अ‍ॅड. नितीन लोणकर (Adv. Nitin Lonakar) आणि अ‍ॅड. सोनाली सुर्यवंशी (Adv. Sonali Suryavanshi) यांच्यामार्फत हरित लवादात धाव घेतली. त्यांनी ऑगस्ट 2019 मध्ये प्रकरण दाखल केले. यावर ऑक्टोबर 2019 मध्ये पर्यावरण आघात मूल्यांकन अधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सदस्यांची समिती स्थापन (Establishment of Committee) करण्यात आली. या समितीला प्रकल्पाची वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल सादर करण्याचे आदेश हरित लवादाने दिले. त्यानुसार समितीने जानेवारी 2020 मध्ये वस्तुस्थिती दर्शवणारा अहवाल हरित लवादाकडे सादर केला.

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 28 जानेवारी 2022 रोजी प्रतिज्ञापत्र (Affidavit) दाखल करुन 15 कोटी 99 लाख रुपयांचा पर्यावरण नुकसानीचा ताळेबंद मांडला. तर एकता हाउसिंग कंपनीने प्रतिज्ञापत्र सादर करुन तक्रार अर्ज रद्द करण्याची मागणी केली. अंतिम सुनावणीदरम्यान लवादाने एकता हाउसिंग कंपनीचे मुद्दे खोडत पर्यावरणाची हानी केल्याबद्दल 15 कोटी 99 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले.

 

Web Title :- NGT Imposes Fine On Ekta Housing Pvt. Ltd | National Green Tribunal (NGT) Fined Rs 15.99 crore Order to stop construction to Ekta Housing Pvt. Ltd

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा