क्राईम स्टोरीताज्या बातम्यापुणे

Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील 6 दुकाने आगीत भस्मसात (VIDEO)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Hadapsar Fire | हडपसर येथील गाडीतळावरील दुकानांना मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत ६ दुकाने जळून भस्मसात झाली. अग्निशामक दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांना ४० मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यास यश आले. (Pune Hadapsar Fire)

 

हडपसरच्या गाडीतळावर एकाशेजारी एक अशी दुकाने आहेत. मध्यरात्री साडेबारा वाजता या दुकानांना आग लागली. याची खबर अग्निशामक दलाला १२ वाजून ३५ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर २ बंब आणि २ वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले. गाड्या पोहचेपर्यंत आगीने मोठे रौद्र रुप धारण केले होते.

 

 

याबाबत अग्निशामक दलाचे अधिकारी प्रमोद सोनवणे यांनी सांगितले की, गाडीतळावरील ही दुकाने एका रांगेत आहेत. त्यात ४ चप्पलची व २ फळांची दुकाने होती. त्यातील एका दुकानात २ जण झोपलेले होते. आगीमुळे झालेल्या आरडाओरड ऐकून ते जागे झाले व बाहेर आले. या आगीत ६ दुकाने जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण अजून समजले नाही. अग्निशामक दलाने ही आग ४० मिनिटांमध्ये आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

 

Web Title :- Pune Hadapsar Fire | Hadapsar Gadital Six Shop Fire

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bharat Bandh 2022 |  28 आणि 29 मार्चला ‘भारत बंद’ ! बँकिंगसह ‘या’ सेवांवर होणार परिणाम

Pune Crime | ‘माझे पती PSI आहेत’, पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नी आणि सासूचा महिलेवर प्राणघातक हल्ला

Ahmednagar Crime | कट्टर शिवसेना कार्यकर्त्याची आत्महत्या; परिसरात खळबळ 

Back to top button