RAW, IB च्या साथीने NIA चे जम्मू काश्मीरमध्ये 10 ठिकाणी छापे

श्रीनगर : NIA|आयएसआयएस मॉड्यूल आणि टेरर फंडिंगच्या प्रकरणात रॉ (RAW) आणि आयबीच्या(IB) साथीने एनआयएने (NIA) जम्मू काश्मीरमध्ये १० ठिकाणी छापे घातले असून अनेकांची चौकशी सुरु केली आहे. टेरर मासिकाबाबत हे छापे घातले असून या मासिकाचे आतापर्यंत १७ अंक प्रकाशित झाले आहेत.

या मासिकामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव बाबतचे लेख छापले जातात. हे मासिक अफगाणिस्तानमधून प्रकाशित केले जात असल्याचे मानले जात होते. आयएसशी (IS) संबंधित जम्मू काश्मीर/ दिल्लीची टीम हे मासिक प्रकाशित करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधातूनच तपास एजन्सींनी काश्मीरमध्ये १० ठिकाणी छापे घातले आहेत.

एनआयएने आज सकाळी दारुल उलूम, दलाल मोहल्ला, नवाबाजार या भागात पोलीस, एसओजी,
एसडीपीओ यांचे अनेक अधिकार्‍यांसमवेत हे छापे घातले. तपासणीत काही ऑफिस रेकॉर्ड, एक
लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर अदनान अहमद नदवी (Adnan Ahmed Nadvi) याला अटक करण्यात आली आहे. नदवी हा हाकाबाजार येथे राहणारा आहे. काश्मीरमधील दारुल उलूम ही उत्तर प्रदेशातील लखनौ येथील दारूल उलूमशी संबंधित आहे.

हे देखील वाचा

BSNl कंपनीकडून यूजर्संना जबरदस्त भेट, 2 प्लान मधील बेनिफिट्स केले रिवाईज, जाणून घ्या सविस्तर

Income Tax Department Recruitment-2021 | मुंबई Income Tax विभागात 155 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : NIA raids at 10 places in Jammu and Kashmir with RAW, IB

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update