भारतातील लोकांकडून ‘नॅशनल जीजू’ म्हटलं जाण्यावर निक जोनासनं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठी कायमच चर्चेत असते. तिचे अनेक आऊफिट्स आजवर चर्चेचा विषय ठरले आहेत. प्रियंका चोपडा सध्या पती निक जोनास (Nick Jonas) सोबत मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. आज ती ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. निकचंही भारतावर खूप प्रेम आहे. त्यानं इथल्या संस्कृतीविषयी देखील खूप माहिती घेतली आहे. भारतामधील लोकांकडून जीजू म्हटलं जाण्यावरही त्यानं प्रतिक्रिया दिली आहे.

जीजू म्हटलं जाण्यावर बोलताना निक म्हणाला, मला वाटतं की, प्रियंका एका प्रकारे देशाची बहिण आहे. आणि मी त्या बहिणची पती बनून खुश आहे.

तर प्रियंका चोपडानं यावर बोलताना सांगितलं की, जेव्हा त्यांनी लग्न केलं होतं तेव्हा सोशल मीडियावर राष्ट्रीय जीजू हे टोपणनाव ट्रेड करत होतं.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तिच्याकडे वी कॅन बी हिरोज (We Can Be Heroes) हा सिनेमाही आहे.